Goa: मच्‍छीमारांचे समुद्रात जाणे झाले कठीण

नदीचे मुख गाळाने भरले; तळपणची मासेमारी लांबणार
Fishing Boat
Fishing BoatDainik Gomantak

काणकोण : काणकोण (Canacona) तालुक्यातील एकमेव जेटी असलेल्या तळपण जेटीवरून ट्रॉलर्स तसेच होड्यांना (Boat) खोल समुद्रात मासेमारीसाठी (Fishing) जाण्‍यास अडचणी येत आहेत. तौक्ते चक्रीवादळ आणि त्‍यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे तळपण नदीचे मुख गाळाने भरलेले आहे. त्यामुळे आज 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झाला असला तरी येथील बहुतांश ट्रॉलर्स समुद्रात गेलेच नाहीत. (It was difficult for fishermen of Goa go to sea)

तळपण नदीच्‍या मुखाजवळच वाळूचा पट्टा तयार झाला आहे. त्‍यामुळे जेथून ट्रॉलर्स समुद्रात जातात ते नदीचे मुखच गाळाने भरलेले आहे. मच्छीमारांना मासेमारीसाठी ट्रॉलर्स, बोटी समुद्रात नेणे व पुन्‍हा जेटीकडे येणे कठीण तसेच असुरक्षित बनले आहे. काही बोटमालकांनी धोका न पत्करता बोटी जेटीवर काढून ठेवल्या आहेत तर अवघ्‍याच बोटमालकांनी संधी मिळताच मासेमारीसाठी समुद्रात जाण्‍यासाठी बोटी सज्ज ठेवल्‍या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच मच्‍छीमारांच्‍या जाळ्‍यात कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळते. मात्र परिस्थिती अशीच राहिल्यास येथील मच्छीमारांवर या उत्‍पन्नाला मुकण्याची पाळी येऊ शकते.

Fishing Boat
‘कदंब’ची कर्नाटकातील आंतरराज्‍य वाहतूक सुरू

दरम्‍यान, तळपण नदीचे मुख गाळाने भरले असले तरी भरतीच्यावेळी लहान होड्यांना समुद्रातून ये-जा करता येते. पण त्‍यासाठी भरतीची प्रतीक्षा करत बसावे लागते. पण ट्रॉलर्सना समुद्रात जाणे शक्‍य होत नाही. शिवाय नदीच्‍या मुखाजवळील पात्रात कातळ आहे. त्याचाही त्रास मच्छीमारांना होतो.

तळपण नदीचे मुख गाळमुक्त करण्याची मागणी येथील मच्छीमार गेली अनेक वर्षे सातत्याने सरकारकडे करत आहेत. मात्र, आश्वासनापलीकडे आतापर्यंत त्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. जेटीच्या दुरूस्तीचा व विस्तारीकरणाचा प्रश्नही प्रलंबित आहे. नदीतील गाळाची समस्‍या अशीच कायम राहिल्‍यास पेच निर्माण होईल.

- रूद्रेश नमशीकर, स्‍थानिक पंचसदस्‍य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com