Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: दाद मागावी, सभात्याग करावा की फलक दाखवावेत? विरोधकांच्यात 'एकी'चा अभाव

Goa Assembly session February 2025: कालपर्यंत सरकारचा निषेध कोणत्या मार्गाने करावा याबाबत काँग्रेसच्याच तीन आमदारांचे ठरले नव्हते हे आमदार कार्लुस फेरेरा यांनी मान्य केले होते.

Sameer Panditrao

Goa Assembly Winter Session 2025

पणजी: विरोधात केवळ सात आमदार असूनही त्यांच्यात एकी नसल्‍याचे आज विधानसभेत उघड झाले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणावेळी सभात्याग करावा, सभापतींसमोरील हौद्यात जाऊन दाद मागावी की फलक फडकावत तेथेच उभे रहावे, याबाबत त्यांच्यात एकमत नव्हते.

कालपर्यंत सरकारचा निषेध कोणत्या मार्गाने करावा याबाबत काँग्रेसच्याच तीन आमदारांचे ठरले नव्हते हे आमदार कार्लुस फेरेरा यांनी मान्य केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा अधिवेशनाआधी बैठक घेऊन त्यात हे सारे ठरवण्यात येईल. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई विधानसभेत येताना कागदी फलक तयार करून घेऊन आले होते. याचा अर्थ निषेध कसा करावा याविषयी त्यांच्या मनात स्पष्टता होती.

सरदेसाई यांनी ते फलक ‘आप’चे व्‍हेंझी व्हिएगस यांना दिले, पण त्यांनी ते फडकावले नाहीत. नंतर तर त्यांनी ते आपल्या टेबलावरून खाली ठेवले.

राज्यपाल भाषणासाठी उभे राहिल्यानंतर विरोधी आमदार बोलत राहिल्याने त्यांना विधानसभेतून बाहेर काढण्याचा इशारा सभापती रमेश तवडकर यांनी दिला. त्‍यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांना इशारा करत राहिले. त्या दोघांकडे फेरेरा यांची नजर होती. आलेमाव विधानसभेबाहेर निघाल्यावर त्यांच्यासोबत एल्टन व फेरेरा निघाले.

त्याचवेळी व्‍हेंझी हे सरदेसाई यांना सभात्याग करण्‍यासाठी खुणावत होते. मात्र सरदेसाई तेथेच उभे राहिल्याने व्‍हेंझी बाहेर गेले आणि त्यांच्यापाठोपाठ क्रुझ सिल्वाही निघाले. बाहेर जाताना युरी आलेमाव हे वीरेश बोरकर यांच्याकडे काही वेळ थांबले. त्यानंतर बोरकरही त्यांच्यामागे विधानसभेबाहेर गेले. त्यानंतर बोरकर सहा मिनिटांत परत आले. सिल्वा यांच्यापाठोपाठ फेरेरा व व्‍हेंझी हेसुद्धा विधानसभेत येऊन बसले. त्‍यामुळे अभिभाषणादरम्यान पूर्ण सभात्याग केवळ युरी व एल्टन यांचाच होता असे दिसून आले.

विरोधी आमदाराचे कर्तव्य मी निभावले आहे. काल मी विदेशात होतो. तेथून युरी आलेमाव व व्‍हेंझी व्हिएगश यांच्याशी संपर्क साधला होता. आज विधानसभेत कोणती भूमिका घ्यावी, याविषयी ते बोलणे होते. वीरेश बोरकर यांनी फोन उचलला नाही. सभात्याग हा विषय त्या चर्चेत नव्हता. त्याची मला कल्पना नव्हती. सभात्याग केलेली व्यक्ती पुन्हा आत येते, त्यातून कोणता उद्देश साध्य झाला हेच समजत नाही.
विजय सरदेसाई (आमदार-गोवा फॉरवर्ड)
आज राज्यपालांचे अभिभाषण होते. अशावेळी कुठलाही विरोधी आमदार सभापतींसमोरील हौद्यात उतरला असता तर कदाचित आम्हाला पुढच्या कामकाजात भाग घेण्यापासून रोखले असते आणि तेच आम्हाला नको होते. निषेध नोंदविताना कुठलाही अतिरेक नको असे आमचे धोरण होते. मात्र निषेध नक्की कसा नोंदवावा हे ठरले नव्हते.
व्‍हेंझी व्‍हिएगस (आमदार ‘आप’)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT