Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: आत्महत्या की घातपात? वास्कोत रेल्वे ट्रॅकवर आढळला शरीरापासून डोकं वेगळं असलेल्या व्यक्तीचा मृतदेह

Vasco Railway Track Death: वास्को शहरातील तानिया हॉटेलसमोरील रेल्वे मार्गावर रविवारी (२३ मार्च) एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.

Sameer Amunekar

वास्को: वास्को शहरातील तानिया हॉटेलसमोरील रेल्वे मार्गावर रविवारी (२३ मार्च) एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या या इसमाचे धड व डोके शरीरापासून वेगळे झालं होतं. त्यामुळं हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना या घटनेबाबच कळवलं. त्यानंतर पायलट राम विजय कुमार यांनी या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मृतदेह पुढील तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेच्या सर्व बाजूंची तपासणी सुरू असून, आत्महत्या की घातपात याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.

याप्रकरणी अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिस नागरिकांना मदतीचे आवाहन करत आहेत. संबंधित व्यक्तीबाबत कोणालाही माहिती असल्यास त्यांनी तातडीने स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT