Goa Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशन! सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची कसोटी; 3 दुरुस्ती विधेयके होणार सादर

Goa Assembly Budget Session 2025: पहिल्या दिवशीच विरोधक किती आक्रमक राहतात, हे दिसून येईल. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची कसोटी लागणार आहे.
Goa Legislative Assembly Budget Session 2025
Goa Budget Session 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Budget Session 2025

पणजी: विधानसभेच्या तीन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनास उद्या, सोमवारी (ता. २४) सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडे मागील १५ दिवसांत राज्यासह देशभरात खळबळ उडवून देणारे सनसनाटी विषय असून सरकारला घेरण्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘गोमन्तक’ने वाचा फोडलेला गोवा विद्यापीठातील पेपर चोरी प्रकरणाचा विषय सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारा ठरू शकतो; परंतु गत अधिवेशनाप्रमाणे विरोधक विस्कळीत राहणार की संघटित, हे या तीन दिवसांत दिसून येईल. २६ रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २०२५-२०२६ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

आतापर्यंत बहुमताच्या जोरावर सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशीच विरोधक किती आक्रमक राहतात, हे दिसून येईल. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची कसोटी लागणार आहे.

या अधिवेशनात विधानसभा सदस्यांकडून १८० तारांकित आणि ५४८ अतारांकित प्रश्न विचारले जाणार आहेत. विधानसभेचा तीन दिवसांचा कालावधी ठेवल्याने अगोदरच विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही हिवाळी अधिवेशन तीन दिवसांचेच होते. त्यामुळे विरोधकांनी कामकाजाला कमी कालावधी दिल्याने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती.

विरोधकांचा आवाज दाबला जातोय

सरकारला लोकशाही मार्गाने कामकाज चाललेले नको वाटते. इतर सर्व राज्यांत विरोधकांचे म्हणणे सत्ताधारी ऐकून घेतात, तेथील सभापतीही त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ देतात. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीने (बीएसी) केलेल्या मागणीनुसार सभापतींनी विरोधकांना वेळ देणे आवश्यक आहे. आम्ही केवळ सातजण आहोत; पण तेही भारी पडत असल्याने आमचा आवाज दाबला जातो, अशी प्रतिक्रिया युरी आलेमाव यांनी व्यक्त केली आहे.

...हे विषय ठरणार वादळी

मडगावातील कथित सामूहिक बलात्कार प्रकरण, श्री खाप्रेश्वर स्थलांतर, म्हादई, टीसीपी कायदा १७ (२) हे विषयही विरोधकांना आयते कोलीत देणारे ठरले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Goa Legislative Assembly Budget Session 2025
Goa Budget: करवाढ नको, ॲप आधारित टॅक्सी, व्यवसाय सुलभीकरण व्हावे, अर्थसंकल्पापूर्वी GCCIचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

आज तीन दुरुस्ती विधेयके

सोमवारी सरकारतर्फे तीन दुरुस्ती विधेयके सादर होणार आहेत. पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर दिवंगतांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात येईल. त्यात माजी आमदार लवू मामलेदार, गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित स्व. प्रभाकर कारेकर, अयोध्येतील राम मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा समावेश आहे.

Goa Legislative Assembly Budget Session 2025
Goa Budget Session 2025: तीन दिवसांचे अधिवेशन! विरोधी पक्षाच्या आमदारांना मुद्दे मांडण्याची मुभा द्या; LOP आलेमाव

या महत्त्वाच्या विषयांवरही खल

१. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोवा राज्य संशोधन फाऊंडेशन दुरुस्ती विधेयक, खासगी विद्यापीठ दुरुस्ती विधेयक सभागृहात सादर करतील.

२. रोजगार आणि कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात हे रोजगार विनिमय (खासगी नोकरींची अधिसूचना) दुरुस्ती विधेयक २०२५ सादर करतील.

३. खासगी कंपन्यांनी रोजगार विनिमय केंद्राला भरतीसाठी असलेल्या रिक्त जागांची माहिती न दिल्यास दंडाची तरतूद या विधेयकात आहे.

४. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांत दुपारच्या भोजनानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल.

राज्यासमोर पेपर चोरी प्रकरण, पर्यटन, म्हादई, बेरोजगारी, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर नक्कीच आवाज उठविला जाईल. त्याचबरोबर सरकार कर्ज काढून उत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पातून फारसे काही पदरी पडणार नाही, असेच दिसते.

युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते, काँग्रेस.

अधिवेशनात पहिल्या दिवशी नेवरा येथील रेल्वे स्थानकाचा मुद्दा आणि नगरनियोजन कायद्यावरील वादग्रस्त निर्णय उपस्थित करू. लोकहिताला बाधा आणणारे कोणतेही निर्णय सहन करणार नाही. विरोधक म्हणून कामगिरी योग्यरितीने पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहील. मात्र, सरकार आमच्या मागण्या आणि भूमिकेवर काय उत्तर देते, हेही पाहावे लागेल.

वीरेश बोरकर, आमदार, रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष.

तीन दिवसांच्या या छोटेखानी अधिवेशनात ३ महिन्यांपूर्वीच्या राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल. नंतर राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल. बहुमत असलेल्या सरकारला विरोधकांकडून अनेक प्रकरणांत पर्दाफाश होण्याची भीती आहे. त्यामुळे हे अधिवेशन आटोपते घेण्याची घाई आहे. सरकारचे अपयश उघड करण्यासाठी आणि गोव्याला पुढे नेण्यासाठी पर्यायी विचार मांडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन.

विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com