Vasco Market Fire Dainik Gomantak
गोवा

Vasco Market Fire: वास्को संडे मार्केटमधील आगीत दुकाने गमावलेल्या 106 व्यापाऱ्यांना प्रत्येकी 1 लाखांची मदत; महिन्याभरात बाजार सुरू होणार!

Vasco Market Fire: वास्को संडे मार्केटमधील आगीत दुकाने गमावलेल्या १०६ पात्र व्यापाऱ्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोमवारी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: वास्को संडे मार्केटमधील आगीत दुकाने गमावलेल्या १०६ पात्र व्यापाऱ्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोमवारी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.

आगीच्या घटनेनंतर अवघ्या पाच दिवसांत सरकारने मदत दिली असून, दुसरा हप्ता महिन्याभरात वितरित केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, महिन्याभरात त्याच ठिकाणी तात्पुरता बाजार उभारून व्यापाऱ्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची संधी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुरगाव नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर, मामलेदार प्रविणजय पंडित, पालिका प्रशासक जयंत तारी आणि मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक आदी उपस्थित होते.

सरकारच्या पडताळणीनुसार, १०६ पात्र दावेदारांची एकूण १४७ दुकाने आगीत बाधित झाली आहेत. त्यापैकी ९० व्यापाऱ्यांच्या मालाचे व साठ्याचे नुकसान झाले, तर १५ स्थिर हातगाडी विक्रेते असून एका व्यापाऱ्याच्या नाशवंत वस्तू आणि मालसाठ्याचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या स्वरूपानुसार दाव्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

२८ ऑक्टोबर रोजी लागलेल्या आगीत अनेक व्यापाऱ्यांनी दिवाळीसाठी खरेदी केलेला माल आणि बचत गमावली. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारी अधिकारी आणि मुरगाव नगर परिषदेने युद्धपातळीवर पडताळणी पूर्ण केली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी सुरू असलेल्या चौकशीत त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

राज्यातील पालिका बाजारांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेऊन आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे सावंत यांनी सांगितले. आमदार संकल्प आमोणकर यांनी मदतकार्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांचे आभार मानले, तर आमदार कृष्णा साळकर यांनी व्यापाऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: राज्यातील सर्व ग्रामपंचायतींची कर्मचारी संख्या तपासा; उच्च न्यायालयाचे पंचायत संचालनालयाला निर्देश

ST Reservation: एसटींच्या राजकीय आरक्षणासाठी तिहेरी न्यायालयीन लढा; दिल्लीत महत्त्वाची बैठक!

Horoscope: मंगळवारचा दिवस ठरणार लाभदायक! मकर राशीच्या कामात यशाचे योग, मिथुन राशीला मिळू शकते धनलाभाची संधी

Glenn Maxwell Retirement: 286 सामने, 7226 धावा अन् 136 विकेट्स! ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

IND vs NZ ODI Series: 'हिटमॅन', 'रन मशीन'सह टीम इंडियाची फौज सज्ज, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेपूर्वी पाहा कोणाची आकडेवारी किती दमदार

SCROLL FOR NEXT