पाण्याअभावी हाल-अपेष्टा सहन करणाऱ्या वास्को वासीयांनी बायणा येथील पाणी विभाग सहाय्यक अभियंता यांना घेराव घालून जाब विचारताना.
पाण्याअभावी हाल-अपेष्टा सहन करणाऱ्या वास्को वासीयांनी बायणा येथील पाणी विभाग सहाय्यक अभियंता यांना घेराव घालून जाब विचारताना. Dainik Gomantak
गोवा

Goa: पाणी प्रश्नावर वास्को वासियांचा अभियंत्याला घेराव

दैनिक गोमन्तक

दाबोळी: पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या वास्को (Vasco) वासियांची बायणा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात (Department of Public Works) जाऊन सहाय्यक अभियंताला (Engineer) घेराव घालून जाब विचारला. यावर आपण वरिष्ठांची बोलणी करून तोडगा काढण्याचे आश्वासन अभियंत्यांने दिले.

गेले कित्येक वर्षापासून वास्को शहर तसेच इतर भागात पाण्याच्या कमतरतेमुळे लोक हैराण झाले आहे. नळाला पाणी येत नसल्याने लोकांची घालमेल होत आहे. पहाटे दोन वाजता उठून बारीक धारेवर पाणी भरावे लागते. ते पण दोन-तीन घागरी भरल्या तर भरल्या नाही तर काहीच नाही. उलट जागरण अशीच अवस्था वास्को वासियांची झाल्याने पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. लोकांना टँकरमधून पाणी विकत घ्यावे लागते. पण ते पिण्यालायक नसते. ही अधोगती दूर कधी होणार हाच प्रश्न घेऊन वास्को वासियांनी आज सकाळी बायणा येथे सार्वजनिक बांधकाम पाणी विभागात आपला मोर्चा वळवून येथील सहाय्यक अभियंता नरेश पैगीणकर यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी पाण्यासाठी यातना भोगत असलेल्या महिला वर्गाने आपल्या हाल-अपेष्टा सांगितल्या. यावेळी त्यांच्या समवेत वास्को शहर प्रभाग १३ च्या नगरसेविका शमी साळकर, माजी नगरसेवक कृष्णा साळकर, प्रभाग १६ चे नगरसेवक गिरीश बोरकर, प्रशांत नार्वेकर व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना कृष्णा साळकर यांनी लोकांच्या पाण्याविषयी समस्या ही जीवघेणी समस्या असून यावर तोडगा काढण्यास वास्कोचे आमदार असमर्थ ठरले आहे. तसेच दुर्मिळ झालेल्या पाण्याच्या पाईप लाईन बदलण्याची गरज असताना सुद्धा त्या अजुन बदलण्यात येत नाहीत. त्यामुळे लोकांच्या समस्या वाढतच गेल्या. आता पाईपलाईन बदलण्यापेक्षा स्थानिक आमदारांना बदलणे गरजेचे बनले असल्याचा टोमणा साळकर यांनी मारला. लोकांची ही समस्या चतुर्थीपूर्वी सुटणे गरजेचे आहे. त्याविषयी आम्ही सहाय्यक अभियंताकडे विनंती केली असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान पाणी विभागाचे सहाय्यक अभियंता नरेश पैंगीणकर यांना याविषयी विचारले असता, आपण येथे अतिरिक्त ताबा घेतला असून या लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष घालून वरिष्ठांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच जीर्ण झालेल्या पाण्याच्या पाईप लाईनमुळे ही समस्या उद्भवू शकते असेही ते म्हणाले. याचाही आपण पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित नगरसेवक गिरीश बोरकर यांनी पाण्याच्या वाढीव बिलाविषयी सहाय्यक अभियंता यांना जाब विचारला. ही लोकांची समस्या नवीन नसून कित्येक वर्षाची आहे. ती समस्या दूर करावी अशी विनंती त्यांनी अभियंत्यांना केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT