शिवोली: बागा-कळंगुट येथील टिटो लेन परिसरात (Area) कार्यरत असलेल्या दोन डिस्को क्लब्जमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविडची (Covid19) लागण झाल्याचे खात्रीशीर वृत्त स्थानिक आरोग्य केंद्राकडून (Health Center) मिळाले आहे. संबंधित क्लबच्या (Club) कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे समजताच उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तेथील व्यवसाय तात्पुरत्या काळासाठी (२ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत) बंद ठेवण्याचे आदेश क्लबच्या मालकांना देण्यात आले आहेत
लसीकरण वाढले
शुक्रवारी विविध केंद्रांवर 2695 जणांना पहिला तर 4625 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 12 रोजी नोंद न झालेले पहिला डोस असलेले 807 तर दुसरा डोस असलेले 952 मिळून एकूण 9079 जणांना डोस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 7 लाख 66 हजार 702 तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 6 लाख 37 हजार 896 वर गेली आहे.
कोविड नियमावलीबाबत सरकारची सावध भूमिका
गणेश चतुर्थीच्या काळात कोविड नियमावलीत सूट देण्यावरून सरकारने सावध भूमिका घेतली आहे. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच याविषयीचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पणजीत एका कार्यक्रमानंतर त्यांना चतुर्थीच्या काळात कोविड नियमावलीत सूट देण्याचा विचार आहे का, असे विचारल्यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, उपजिल्हाधिकाऱ्यांना संबंधित गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करण्यास सांगितले आहे. त्यांचे म्हणणे, आरोग्य यंत्रणेचे म्हणणे, प्रशासनाचे निरीक्षण याआधारे निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले, जनतेने कोविड अद्याप नष्ट झालेला नाही हे लक्षात घेऊन वागले पाहिजे. गर्दी टाळावी, अकाकरण सार्वजनिक ठिकाणी जावू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.