Goa Dowry Harassment Case Dainik Gomantak
गोवा

Dowry Harassment Case: 10 लाख अन् 5 तोळं सोन्यासाठी लग्नाला नकार, हुंडा मागणाऱ्या नवरदेवाला गोवा पोलिसांचा दणका; मुलीच्या बापाला धमकी देणं पडलं महाग

Vasco Dowry Harassment Case: दहा लाख रुपये रोख व पाच तोळे सोने दिल्याशिवाय लग्न होणार नाही, असे ऐनवेळी सांगणारा नवरा मुलगा आणि त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात वास्को पोलिसांनी हुंडाविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: दहा लाख रुपये रोख व पाच तोळे सोने दिल्याशिवाय लग्न होणार नाही, असे ऐनवेळी सांगणारा नवरा मुलगा आणि त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात वास्को पोलिसांनी हुंडाविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी लवकरच नोटीस काढून त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुलीच्या वडिलांनी वास्को पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगोरहिल येथे राहणाऱ्या एका मुलीचे लग्न चिंबल येथील युवकाशी होणार होते. या लग्नाच्या बोलणीप्रसंगी हुंड्याविषयी कोणतीही चर्चा झाली नव्हती. मात्र, २९ एप्रिलला नवरा मुलगा आणि त्याच्या आई-वडिलांनी मुलीच्या वडिलांकडे दहा लाख रुपये रोख व पाच तोळे सोने हुंड्याची मागणी केली. ऐनवेळी हुंडा मागितल्यामुळे मुलीच्या आई-वडिलांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय लग्न होणार नसल्याची धमकीही दिली.

मुलीच्या (Girl) वडिलांसह इतरांनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वराकडील मंडळींनी हुंड्याचा हट्टच धरला. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी वास्को पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी वास्को पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक कायदा कलम ४ तसेच इतर कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक डेव्हिड कॉस्ता अधिक चौकशी करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Bicholim Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

SCROLL FOR NEXT