Child Abuse Case: बाणावलीत दोन चिमुरड्या बहिणींवर काकाचा अमानुष छळ; गरम मेणाचे चटके दिल्याचा आरोप

Goa Crime News: बाणावली येथे नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.
Goa Crime News
Child Abuse CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: बाणावली येथे नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. चार आणि आठ वर्षांच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींना त्यांच्या काकाने अमानुष मारहाण करून गरम मेणाचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चार वर्षांच्या चिमुरडीच्या गुप्तांगासह शरीराच्या अन्य भागांवर, तर आठ वर्षांच्या बहिणीच्या पायांवर गरम मेण टाकून भाजण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी संशयित काकाविरुद्ध पोक्सो कायदा, भारतीय न्याय संहिता आणि गोवा बाल कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित मूळचा कारवार येथील असून कामानिमित्त बाणावलीत राहत होता.

Goa Crime News
Goa Transport Rules: गोव्यातील स्थानिक टॅक्सीचालक, बसमालकांच्या संरक्षणासाठी मोटार वाहन नियम बदला; ताम्हणकरांची मागणी

दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी मुलींची आई त्यांना घरी नेण्यासाठी आली असता त्यांच्या शरीरावरील जखमा पाहून हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. कोलवा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) आणि ७४ तसेच पोक्सो व गोवा बाल कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला. संशयिताला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कोलवा पोलीस करीत आहेत.

आई विदेशात नोकरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलींची आई विदेशात नोकरी करीत असल्याने तिने त्यांना आपल्या नणंदेकडे ठेवले होते. काही दिवसांसाठी मुलींना संशयिताच्या घरी ठेवण्यात आले असता त्याने दोघींनाही मारहाण केली. चार वर्षांच्या मुलीला गरम मेणाचे चटके दिले. हा प्रकार पाहिलेल्या आठ वर्षांच्या बहिणीने नातेवाइकांना त्याची माहिती दिली. त्यामुळे संशयिताने तिलाही गरम मेणाचे चटके दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Goa Crime News
Goa Police Suspension: लाचखोरी, कोठडीतील मारहाण ते लैंगिक अत्याचाराचे आरोप; गोव्यात 10 महिन्यांत 26 पोलिस निलंबित!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.