VIDEO: फुटबॉल जगतात खळबळ! सामन्यादरम्यान गोलकिपरशी जीवघेणी टक्कर; 30 वर्षीय स्टार फुटबॉलपटूचे निधन

Spanish Footballer Jesus De Miguel Dies: फुटबॉल जगतातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. स्पेनच्या दुसऱ्या डिव्हिजनमधील 'सीडी टेनरिफ' क्लबचा स्टार फॉरवर्ड खेळाडू जीसस डे मिगुएल याचे वयाच्या 30व्या वर्षी निधन झाले.
Spanish Footballer Jesus De Miguel Dies
Spanish Footballer Jesus De Miguel DiesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Spanish Footballer Jesus De Miguel Dies: फुटबॉल जगतातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. स्पेनच्या दुसऱ्या डिव्हिजनमधील 'सीडी टेनरिफ' क्लबचा स्टार फॉरवर्ड खेळाडू जीसस डे मिगुएल याचे वयाच्या 30व्या वर्षी निधन झाले. या दुर्देवी घटनेमुळे फुटबॉल विश्वात शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान एफसी एंडोरा संघाचा गोलकीपर जीसस ओवोनो याच्याशी झालेल्या भयानक टकरीनंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ही दुर्देवी घटना 'एस्टाडियो हेलियोडोरो रोड्रिग्ज लोपेज' मैदानावर टेनरीफ आणि एंडोरा यांच्यातील सामन्यादरम्यान घडली, ज्यावेळी दोन्ही संघ 2-2 अशा बरोबरीत होते. मिगुएल एका लांब बॉलचा पाठलाग करत असताना, गोलकीपर ओवोनो त्याला रोखण्यासाठी पेनल्टी एरियाच्या बाहेर आला. या धावपळीत मिगुएल याच्याशी त्याची टक्कर झाली.

Spanish Footballer Jesus De Miguel Dies
ISL Football: आयएसएलमध्ये एफसी गोवा विजयाच्या शोधात! फातोर्ड्यात स्पोर्टिंग क्लब दिल्लीशी भिडणार

या जोरदार टकरीनंतर मैदानावरील वैद्यकीय पथकाने तातडीने धाव घेत पाच मिनिटांहून अधिक काळ मिगुएल याच्यावर उपचार केले. यादरम्यान त्याला कार्डियोरेस्पिरेटरी अरेस्ट आल्याचे समोर आले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ आयसीयूमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याची न्यूरोलॉजिकल स्थिती खालावत गेल्याने मंगळवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

Spanish Footballer Jesus De Miguel Dies
Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

मिगुएलने 2015 मध्ये लेगानेस बी मधून आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर तो अनेक स्पॅनिश क्लब्ससाठी खेळला. गेल्या वर्षी तो टेनरीफ क्लबशी जोडला गेला होता. या दुर्देवी घटनेनंतर एंडोरा क्लबसह संपूर्ण फुटबॉल जगतातून शोक व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.