IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन-डेसाठी रणनीती ठरली! प्लेइंग-11 बाबत शुभमन गिलने सोडले मौन; कोण होणार बाहेर आणि कोणाला मिळणार संधी?

Shubman Gill Press Conference Playing 11 Update: भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेचा थरार रंगणार आहे.
Shubman Gill Press Conference Playing 11 Update
Shubman Gill Press ConferenceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Shubman Gill Press Conference Playing 11 Update: भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 4 नोव्हेंबर रोजी ऑकलॅंडच्या ईडन पार्क मैदानावर खेळवला जाणार आहे. टी-20 मालिकेत भारताने 3-2 ने विजय मिळवला असला, तरी शेवटच्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता वन-डे मालिकेत प्लेइंग-11 मध्ये कोणाला संधी मिळणार आणि कोण बाहेर होणार, याविषयी क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यातच, कर्णधार शुभमन गिलने पत्रकार परिषदेत याबाबत मोठे संकेत दिले.

गिलने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, संघातील पहिले चार फलंदाज निश्चित आहेत. मात्र, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सामन्याची स्थिती पाहून या क्रमांकावर खेळाडूंची निवड केली जाईल, असे त्याने सांगितले. जर संघात डावखुऱ्या फलंदाजाची गरज भासली, तर अक्षर पटेलला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकते, असे संकेतही गिलने दिले. या वक्तव्यामुळे केएल राहुलच्या पाचव्या क्रमांकाबाबत साशंकता निर्माण झाली.

Shubman Gill Press Conference Playing 11 Update
Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मागील काही वर्षांत केएल राहुलने (KL Rahul) पाचव्या क्रमांकावर येऊन अनेकदा संकटात सापडलेल्या भारतीय संघाचा डाव यशस्वीपणे सावरला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अलीकडील सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. या क्रमांकावर खेळताना त्याची आकडेवारी अत्यंत दमदार आहे. राहुलने 5व्या क्रमांकावर 36 वन-डे सामन्यांत 68.58च्या अप्रतिम सरासरीने 1,646 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 103.19 चा शानदार स्ट्राइक रेट, 4 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

Shubman Gill Press Conference Playing 11 Update
Team India Players Retirement: रोहित शर्मा, मोहम्मद शमी... युवा खेळाडूंची एन्ट्री, दिग्गजांची एक्झिट! 2026 मध्ये टीम इंडियाचे 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती?

अशा स्थितीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या राहुलच्या फलंदाजीच्या क्रमांकात बदल करणे किंवा त्याच्या जागेबाबत प्रयोग करणे भारतीय संघाला महागात पडू शकते, अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे. आता प्रत्यक्षात कर्णधार आणि व्यवस्थापन पहिला सामना खेळण्यासाठी कोणती रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.