Launched by MLA Ganesh Gawkar Gomantak Digital Team
गोवा

Vasco Development : कुळे-शिगावमध्‍ये विकासगंगा!

दीड कोटींची कामे : आमदार गणेश गावकर यांच्‍या हस्‍ते शुभारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Development : कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रात जलदगतीने विकासकामे होणार आहेत. कारण सर्व प्रभागांत मिळून एकूण एक कोटीच्या वर पंचायत निधी मंजूर करण्‍यात आलेला आहे. तसेच रस्ता विभागातर्फे ५० लाख खर्च करण्यात येणार आहे. या कामांचा शुभारंभ सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार गावकर म्हणाले की, सावर्डे मतदारसंघातील सर्व पंचायत क्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात विकास साधण्यात येईल. कुळे-शिगाव पंचायत आर्थिक दृष्टीने भक्कम आहे. याच निधीतून दीड कोटींची कामे पंचायतने हाती घेतलेली आहेत. त्यामुळे गावाचा विकास होणार असल्याने पंचायत मंडळ कौतुकास पात्र ठरत आहे.

लोकांसाठी जी विकासकामे हवी होती, ती पंचायत व रस्ता विभागातर्फे हाती घेण्‍यात आलेली आहेत, असे सरपंच गोविंद शिगावकर यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच नेहा मडकईकर, पंच बेनी आझावेदो, साईश नाईक, प्रसाद गावकर, अनिकेत देसाई, आश्विनी नाईक देसाई व इतर मान्‍यवर उपस्‍थित होते.

पाणी, मैदान प्रश्‍‍न सोडविणार

सावर्डे मतदारसंघातील लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ५ एमएलडी क्षमतेचे तीन जलशुद्धीकरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्‍नशील आहे. कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रात स्वत:ची मैदानाची जागा आहे. क्रीडा खात्यातर्फे मैदानाची उभारणी करून सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार गणेश गावकर यांनी सांगितले.

भूमिगत वीजवाहिन्‍या घालणार

सावर्डे मतदारसंघातील सर्व वीजवाहिन्या जीर्ण झालेल्‍या आहेत. गेल्या वेळी केबल घालून लोकांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला होता. पण ती केबल कुचकामी ठरली आहे. यासंदर्भात मी विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्‍यावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सर्व भूमिगत वीजवाहिन्या घालून वीजपुरवठा सुरळीत करणार असल्याचे आमदार गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT