Goa Crime Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: पहाटे 2 ते 4 ची वेळ साधली, वाड्यावरची सहा घरे फोडली; दाबोळीतील घटनेने खळबळ

Goa Crime Case: 7 लाखांच्या सोन्यासह, रोकड तसेच किरकोळ वस्तू केल्या लंपास

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: गोव्यात अपघातांसोबतच गुन्हेगारी वाढली असल्याचे वेळोवेळी दिसून आलेय. एकाच रात्रीत तब्बल सहा घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवल्याची धक्कादायक घटना समोर आल्यावर गोव्यातील गुन्हेगारीची तीव्रता समजून येतेय.

या चोरीप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आल्त-दाबोळीतील एकता वाड्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली आहे.

या घरफोडीप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार या वाड्यावर साधारणतः 17 घरे दाटीवाटीने उभारलेली आहेत. या घरांपैकी जी घरे बंद होती, तीच चोरट्यांनी फोडली आहेत.

काही दिवसांपासून या भागात एक भिकारी फिरत असून कित्येकवेळा तो भिकारी दुपारच्यावेळी दारावर बसून भीक मागण्यासाठी हटून बसायचा असे येथील स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे या घरफोडीमागे त्याचाच हात असल्याचा दाट संशयही त्यांनी व्यक्त केलाय.

या घरफोडीमध्ये एका घरातून 7 लाख रुपये किमतीचे सोने आणि रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले तर इतर घरांतून किरकोळ वस्तू चोरीला गेल्या आहेत.

घराच्या मुख्य दरवाजांच्या कड्या तोडून चोरट्यांनी कपाटे फोडून जे मिळेल ते किमती अलंकार घेऊन पलायन केल्याचे आढळून आले आहे. मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाड्यावरील रहिवासी जागे असतात.

त्यामुळे ही चोरी पहाटे 2 ते 4 याच कालावधीत करण्यात आली असावी, असेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घरफोडीचा तपास वास्को पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT