Goa Shigmotsav 2024: गोव्यात कार्निव्हल नंतर उत्साहाचा असणारा शिगमोत्सव यंदा 26 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान राज्यात साजरा होणार असल्याची माहिती मिळतेय. कार्निव्हल प्रमाणेच शिगमोत्सवातील आकर्षक चित्ररथ लोकांचे लक्ष वेधून घेत असतात.
गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मधल्या शिगमोत्सवाची सुरुवात ही फोंडा तालुक्यात 8 मार्चपासून झाली होती. यंदा मात्र 26 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान शिगमोत्सव साजरा होणार असल्याची माहिती गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
शिगमोत्सव हा गोव्याची संस्कृती आणि परंपरा दाखवणारा सोहळा असून गोमंतकीयांच्या जिव्हाळ्याचा क्षण आहे. शिगमोत्सवामध्ये, धनगरी, शेतकरी अशा प्रकारची लोककला दाखवणारी नृत्य सादर होत असतात.
गोव्याची ओळख दाखवणारी घोडेमोडणी हा कला प्रकारदेखील यात सादर केला जातो. तसेच पालखी नाचवणे, ढोलताशा पथकाचे वादन, रोंबट अशा सांस्कृतिक आणि कलात्मक या शिगमोत्सवात सादर केल्या जात असून त्या गोष्टी पाहण्यासाठी अनेक पर्यटक गोव्यात दाखल होत असतात.
दरम्यान शिगमोत्सवाची सुरुवात कोणत्या तालुक्यापासून होणार याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. पणजीतील रस्त्यांची दुरावस्था पाहिल्यास यंदाही शिगमोत्सवर त्याचा काही परिणाम होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.