संहितेत दुरुस्ती करुन मंत्री पुत्राला कोमुनिदादचा भूखंड, गुदिन्हो यांना मंत्रीमंडळातून वगळा; काँग्रेस

नवीन दुरुस्त्या वापरून आपल्या मुलाला 400 चौरस मीटरचा भूखंड दिला, असा आरोप कॅप्टन वेरियतो फर्नांडिस यांनी केला.
Goa Congress
Goa Congress
Published on: 
Updated on: 

Goa Congress: भाजप सरकारने मंत्र्यांच्या मुलांना फायदा व्हावा यासाठी कोमुनिदादच्या प्रधान संहितेत दुरुस्ती केल्याचा आरोप करत काँग्रेसने शुक्रवारी ही संदिग्ध दुरुस्ती मागे घेण्याची व मंत्री माविन गुदिन्हो यांना मंत्रीमंडळातून वगळण्याची मागणी केली.

नवीन दुरुस्त्या वापरून आपल्या मुलाला 400 चौरस मीटरचा भूखंड दिला, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस कॅप्टन वेरियतो फर्नांडिस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद केला.

यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि जॉन नाझरेथ उपस्थित होते.

जून 2023 मध्ये, कोमुनिदादच्या प्रधान संहितेच्या कलम 334- अ मध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्या संबंधित कोमुनिदादच्या भागधारकाच्या "भूमिहीन" मुलांना कोमुनिदादचे भूखंड वाटप करण्याची परवानगी देण्यासाठी सोयीस्करपणे दुरुस्ती करण्यात आली, असे फर्नांडिस म्हणाले.

या दुरुस्तीच्या अनुषंगाने, डिसेंबर 2023 च्या राजपत्रात असे घोषित करण्यात आले की मॅककिन्ले इमॅन्युएल गुदिन्हो, ह्याला चिखली कोमुनिदाद मध्ये 400 जमिनीचा भूखंड देण्यात आला.

मॅककिन्ले इमॅन्युएल गुदिन्हो हे प्रमोद सावंत भाजप सरकारमधील पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांचे पुत्र आहेत. यावरूनच भाजप सरकारचा दुरुस्ती आणण्याचा हेतू सिद्ध होतो,” असे फर्नांडिस म्हणाले.

मंत्र्यांच्या मुलाने शपथपत्रात त्यांच्याकडे कोणतीही निवासी जमीन नाही असे म्हटले आहे. आणि त्यांना नवीन वाटपानुसार जमीन देण्यात यावी. पण त्याच्या नावावर आधीच तीन प्लॉट आहेत.

हे एकूण भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे, जिथे मंत्र्यांच्या मुलाला नवीन दुरुस्तीचा फायदा झाला आहे, असे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Congress Party Registration Case
Goa Congress Party Registration Dispute
Goa election 2027 AAP Congress
Girish Chodankar Congress Alliance
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com