Mauvin Godinho | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Mauvin Godinho: पुढील वीस वर्षांत भासणार तिसऱ्या विमानतळाची गरज

Mauvin Godinho: ‘दाबोळी’साठी 1300 कोटींचा खर्च

दैनिक गोमन्तक

Mauvin Godinho: पर्यटन स्थळासाठी देशी-विदेशी पर्यटकांची गोव्याला पसंती आहे. यामुळे हवाई प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढणार असल्याने दोन विमानतळांची गरज आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुढील वीस वर्षांत कदाचित तिसऱ्या विमानतळाची गरज भासण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रतिपादन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे विद्युत वाहक (कंडक्टर्स) बदलून त्याजागी उच्च क्षमतेचे नवीन विद्युत वाहक बसविण्याच्या कामाला मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते आज प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी दाबोळी विमानतळ बंद होणार असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना त्यांनी लक्ष्य केले.

याप्रसंगी वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव व इतर मान्यवर उपस्थित होते. नवीन व उच्च क्षमतेचे विद्युत वाहक हे वेर्णा उपस्थानक ते सांकवाळ उपस्थानक, तेथून कंदब बसस्थानक वास्को उपस्थानकापर्यंत बदलण्यात येणार आहेत.

यामुळे विद्युत प्रवाह खंडित होण्याचे प्रकार कमी होतील, अशी माहिती गुदिन्हो यांनी दिली. दरम्यान, दाबोळी विमानतळ ते वेर्णा असा नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढील तीन महिन्यांत 550 कोटी रुपये खर्चून अंडरपास तयार केला जाईल, अशी माहिती गुदिन्हो यांनी नुकतीच दिली होती.

‘मोपा’चा प्रवास महागडा!

येणाऱ्या काळात हवाई प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळाची गरज असेल. ‘दाबोळी’ हे जुने व भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे आहे. तर मोपा विमानतळ एका खासगी कंपनीचे आहे.

विमानांसाठी लागणारे इंधन मुरगावातून ‘मोपा’पर्यंत वाहिन्यातून किंवा टँकरमधून न्यावे लागणार आहे. त्यामुळे इंधनाचा खर्च वाढेल. जेणेकरून ते स्वस्त दरात हवाई सेवा पुरवू शकणार नसल्याचे त्यांनी मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

"दाबोळी विमानतळ बंद होणार नाही. जर ते बंद करायचे होते, तर आम्ही ‘दाबोळी’वर सुमारे 1300 कोटी रुपये खर्च केले असते काय? काहीजण चांगल्या गोष्टींना नाहक विरोध करून लोकांची दिशाभूल करत आहेत."

- माविन गुदिन्हो, मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT