Goa Water Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Water Issue: वेळुस वाळपई मुख्य रस्त्यावर जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया

Goa Water Issue: संबंधित खात्याने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Water Issue: वेळुस वाळपई ह्या ठाणे वाळपई मुख्य रस्त्यावर जलवाहीनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जाण्याची घटना घडली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कमी प्रमाणात पाणी वहात होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे.

हा मुख्य रस्ता असल्याने अनेकांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून तातडीने ही जलवाहीनी दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

एवढी घटना घडूनही संबंधित खात्याने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मागच्याच महिन्यात पर्वरी येथे फ्लायओव्हरचे काम सुरु असतानाही ड्रिलिंग करताना जलवाहिनी फुटण्याची घटना घडली होती. तेव्हाही हजारो लिटर पाणी वाया गेले होते.

दरम्यान गोव्याची जलमागणी लक्षात घेऊन सावंत सरकारने काल सादर केलेल्या बजेटमध्ये महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. पाण्याचे स्त्रोत आणि नदी यांचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी ‘उगम ते संगम’ कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.

यात निसर्ग पदभ्रमण, ड्रोनमधून चित्रीकरण, नदीच्या आरोग्याचे निरीक्षण, नदी संवर्धनासाठ नैसर्गिक उपाययोजना यांचा समावेश असल्याचे सावंत यांनी अधिवेशनात सांगितले होते.

यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली असून तिळारी नदीत पाण्याचा साठा 5.34 अब्ज घनफुटाने महाराष्ट्र सरकारने वाढविण्यासाठी गोवा सरकारने पुढाकार घेणार असल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT