Goa: Valpoi Congress Distributing essential things to those who suffered loss during recent floods Dainik Gomantak
गोवा

Goa Floods: वाळपई काँग्रेसतर्फे ३२५ पूरग्रस्तांना मदतीचा हात

वाळपई (Valpoi) गट काँग्रेसने (Congress) वाळपई मतदारसंघातील ३२५ पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली आहे.

Mahesh Karpe

वाळपई : वाळपई (Valpoi, Goa) मतदारसंघात साडेतीनशे पेक्षा जास्त कुटुंबे पुरामुळे प्रभावित झाली असून, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. वाळपई गट काँग्रेसने पूरग्रस्तांना मदतीचा हात देताना वाळपई मतदारसंघातील ३२५ पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली आहे. (Floods in Goa)

पुराचा मोठा फटका वाळपई मतदारसंघातील सोनाळ, कुडशे, वाळपई पालिका भाग, खडकी, खडकी शिवाजी नगर, बाराजण, खोतोडे, गुळेली, कणकिरे, गांजे, ताकवाडा उसगाव, सोनारभाट व तिळार भागाला बसला व त्यात सुमारे साडेतीनशे कुटुंबे उघड्यावर आली. वाळपई काँग्रेसने पुराच्या दिवशीच मदतकार्य सुरू केले होते. ते आजही चालूच ठेवले आहे. वाळपई गट समितीने प्रत्यक्ष पूरग्रस्तांना भेट देऊन पुरात नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली व त्यांना आवश्यक वस्तूंचे वितरण केले. वाळपई गट काँग्रेस अध्यक्ष दशरथ मांद्रेकर यांनी सांगितले, की वाळपई मतदारसंघात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. ते भरून येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.

सध्या ज्‍यांचे संसार उघड्यावर पडले आहेत त्यांना सरकारकडून आवश्यक मदत मिळत नाही. अजुनही अनेकांच्या घरी अधिकारी पोहोचले नाहीत. त्यामुळे पूरग्रस्तांना सरकारकडून मदत मिळणार अशी आशा धरणे चुकीचे आहे. म्हणून वाळपई काँग्रेसने सामाजिक बांधीलकीतून पूरग्रस्तांची मदत केली आहे. अनेक सामाजिक संस्थांनीसुध्दा मदत केली आहे. तसेच काँग्रेसला मदत केलेले म्हापसा रोटरी क्लब, गोवा महिला काँग्रेस, गोवा युवा काँग्रेस व वाळपई महिला काँग्रेसचे मांद्रेकर यांनी आभार मानले आहेत.

वाळपई महिला काँग्रेस अध्यक्ष रोशन देसाई, नंदकुमार कोपार्डेकर, संजय गावडे, उमाकांत नाईक व म्हापसा रोटरी क्लब पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT