Sunburn Festival Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival Goa 2023: सलग तिसऱ्या दिवशीही सनबर्नमध्ये चोरट्यांचा डल्ला; तब्बल 80हून अधिक मोबाईल फोन 'गायब'

Sunburn Festival Goa 2023: या प्रकारांमुळे गोव्याचे नाव खराब होत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य गोवेकरांच्या तोंडी आहे.

Ganeshprasad Gogate

Sunburn Festival Goa 2023: वागातोर येथे सुरू असलेल्या यंदाचा सनबर्न फेस्टिवल बऱ्याच कारणांनी गाजला. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे या फेस्टिवल मध्ये झालेली मोबाईल फोन्सची चोरी.

सनबर्न फेस्टिवलमध्ये पहिले दोन दिवस महागड्या फोन्सची चोरी करण्याऱ्या 7 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला हणजूण पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून त्यांच्याकडून 25 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.

या घटनेला काही तास उलटताच सनबर्नच्या तिसर्‍या दिवशी 80 हून अधिक हाय एंड फोन चोरीला गेल्याची कळंगुट पोलीस स्थानकात करण्यात आल्यावर सर्वानाच धक्का बसला. या तीन दिवसात साधारणपणे 144 मोबाईलची चोरी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या म्युझिक फेस्टिवलचे रूपांतर थेफ्ट फेस्टिवलमध्ये झाले असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया गोमंतकीयांनी व्यक्त केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर हणजूण पोलीस सटेशनमध्ये चोरीच्या तक्रारी देण्यासाठी अक्षरशः पर्यटकांची रांगच लागलेली पाहायला मिळाली.

त्याआधी सनबर्न ईडीएम महोत्सवात सुमारे 82.50 लाखांच्या तिकिटांच्या (पासेस) चोरीप्रकरणी हणजूण पोलिसांनी कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.

youtube.com/watch?v=96fiJdRZhsw

या प्रकारांमुळे गोव्याचे नाव खराब होत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य गोवेकरांच्या तोंडी आहे. राज्यात ‘सनबर्न’सारख्या निंदनीय कार्यक्रमांना गोव्याच्या भूमीत परवानगी देणे सरकारने थांबवावे.

ज्या पद्धतीने वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हल गोव्यावर बळजबरीने लादला आहे, त्यावरून येथे कायद्याचे राज्य नसल्याचा स्पष्ट होते.

दुसऱ्या बाजूला राज्यात चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे पुढील वर्षी ‘सनबर्न’ महोत्सव कसा होतो ते पाहू, असा इशारा काँग्रेसने दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT