Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: ट्रांसफार्मरमधील हाय वोल्टेजचा 40 घरांना फटका, उसगांव साईनगरातील 'त्या' घटनेमुळे घबराट

ही घटना गुरुवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान घडली.

Ganeshprasad Gogate

Goa Electricity Department वीज ट्रांसफार्मर मधुन अचानक हाय वोल्टेज झाल्याने येथील 40 घरातील विजेवर चालणारी उपकरणे बंद पडल्याची घटना गुरुवारी उसगांव साईनगर येथे घडली.

येथील ट्रांसफार्मर मध्ये विजेचा दाब तीव्र निर्माण झाल्याने जवळपासच्या घरातील चालू असणारे फॅन, फ्रीज, टीव्ही सारखी उपकरणे अचानक नादुरुस्त होऊन बंद पडल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे नागरिकांत घबराट पसरली आहे

सदरच्या घटनेमुळे ऐन गणेश चतुर्थीच्या काळात लोकांना आर्थिक फटका बसलेला आहे. सध्या महागाईने उच्चांक गाठला असून त्यातच हे आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

नुकसानग्रस्त स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळी 6 च्या सुमारास अचानकपणे चालू असलेले फॅन अधिक स्पीडने फिरू लागले तर ट्यूब लाईट, ब्लब सारखी उपकरणे तीव्र प्रकाशमान झाली. तसेच टीव्ही देखील बंद पडले.

काही नागरिकांनी सतर्कता दाखवत घरातील इतर उपकरणांची वीज कनेक्शन बंद केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच नुकसानीचा आकडा देखील समजू शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT