Calangute Mobile Theft: रेस्टॉरंटमधील कामगारांचे फोन लंपास! पोलिसांनी आवळल्या प. बंगालमधील दोघांच्या मुसक्या

चोरांकडून 1,50,000 लाखांचे एकूण 8 फोन जप्त
Calangute Mobile Theft
Calangute Mobile TheftDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Mobile Theft: राज्यात चोरींच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कळंगुटमध्ये मोबाईल चोरीची एक घटना समोर आली आहे. तिथल्या एका रेस्टॉरंट कामाला असलेल्या कामगारांच्या खोलीतून 79 हजारांचे एकूण 4 मोबाईल चोरीला गेले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.

Calangute Mobile Theft
Unity Mall in Goa: ...अन्यथा न्यायालयात धाव घेणार! 'युनिटी मॉल'च्या जागेवरून विजय सरदेसाई आक्रमक

माहितीनुसार, बार्देशमधील 'फिश अँड करी' या बार आणि रेस्टॉरंटमध्ये कामाला असलेल्या चार कामगारांच्या खोलीतून त्यांचे 79 हजारांचे 4 फोन चोरीला गेल्याचे लक्षात आले.

यानंतर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ताबडतोब चोरांचा शोध सुरू केला आणि गुन्हेगार रिझवान मुल्ला आणि मौसेरुल्ल मुल्ला (दोघेही, रा. पश्चिम बंगाल) यांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून 1,50,000 लाखांचे एकूण 8 फोन जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसानी दिली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kanpur Pregnant Woman Suspicious Death
Delhi Metro Viral Video
Thivim Theft
Goa Spa Owner Rape Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com