Goan Drink Urrak  Dainik Gomantak
गोवा

Goa Urrak: फेनीनंतर आता 'उराक'ला GI टॅगसाठी प्रस्ताव; काजू उत्पादक शेतकरी संघटनेचा अर्ज

कोकणात उराक हब तयार करण्याच्या महाराष्ट्राच्या हालचालींनंतर गोवा सरकारचे प्रयत्न

Akshay Nirmale

Goa To Try For GI Tag for Urrak: गोवन काजू आणि गोवन फेनीला जीआय (जिओग्राफिक डिकेशन) टॅग मिळाल्यानंतर आता गोव्याचे वैशिष्ट्यपुर्ण पेय असलेल्या उराक ला देखील जीआय टॅगसाठी प्रयत्न केले जात आहेत.

त्यामुळे आगामी काळात उराक या पेयाला देखील जीआय टॅग मिळू शकतो. उराक हे काजूपासून बनविण्यात येणारे पेय आहे. कोकणात उराक हब तयार करण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत.

ते पाहून गोवा सरकारने तातडीने हालचाली करत गोव्यात लोकप्रिय असलेल्या उराक या पेयाला जीआय टॅग मिळावा, यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हा प्रस्ताव सेंट्रल जीआय रजिस्ट्रीकडे पाठवला आहे. नोडल अधिकारी दीपक परब यांच्या माहितीनुसार, काजू उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटनेच्या वतीने हा अर्ज करण्यात आला आहे. उराकला जीआय टॅगच्या प्रस्तावात काजू उत्पादक संघटना अर्जदार आहे.

महाराष्ट्राने आंब्याच्या काही जातींना जीआय टॅग मिळवून देण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स तयार केला आहे. गोव्याने देखील काजूसाठी असा टास्क फोर्स तयार करणे उचित ठरेल.

जेणेकरून काजूवर काम करणाऱ्या सर्व एजन्सी, कृषी विभाग, ICAR, पर्यटन विभाग आणि आयटी विभाग काजू उत्पादन आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एकत्रितपणे काम करू शकतील.

उराक आणि कॉकटेल प्रकार हे गोव्यात उन्हाळ्यातील लोकप्रिय अल्कोहोलिक पेये आहेत. अलिकडच्या वर्षांत गोवा पर्यटन विकास महामंडळाने आयोजित केलेल्या काजू महोत्सवात देखील उराकला मोठी मागणी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT