Goa Ferry Boat: फेरीबोटमध्ये दुचाकींवर शुल्क आकारण्यास बेटवासियांचा आक्षेप

सरकारच्या प्रस्तावावर आधी फेरी बोट सेवा सुधारण्याचे आवाहन
Goa Ferry Boat
Goa Ferry BoatDainik Gomantak

Goa Ferry Boat: गोव्यातील विविध बेटांवर येण्याजाण्यासाठी राज्य सरकारकडून फेरीबोट सेवा चालवली जाते. दरम्यान, या फेरीबोटींमध्ये दुचाकींवर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर आहे. तथापि, या प्रस्तावाला गोव्यातील बेटवासियांनी विरोध दर्शवला आहे.

राज्यातील 18 मार्गांवर फेरी बोटींवर दुचाकी वाहने नेण्यासाठी शुल्क आकारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. त्यावर बेटवासियांनी चिंता व्यक्त केली आहे. फेरी बोट सेवा ही बेटवासीयांसाठी जीवनावश्यक आहे. त्यांना मुख्य भूभागाशी जोडणारी ही सेवा आहे.

सरकारने फेरीचे शुल्क वाढवण्याआधी पूल बांधण्यावर भर दिला पाहिजे. असे निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकांचे मत घ्या, असे सुचविले. तर कोणत्याही प्रस्तावित टोलमधून दिवार-चोडण फेरीबोट वगळावे, असे आवाहन स्थानिक करत आहेत.

Goa Ferry Boat
Ramesh Tawadkar: माझ्यासमोर वेळेची मर्यादा नाही; सध्या सर्वांच्या बाजू ऐकून घेतोय...

दरम्यान, फेरीबोट सेवेबाबत काही तक्रारीही आहेत. त्या आधी दुरूस्त केल्या जाव्यात, अशी मागणी होत आहे. बेटवासी या फेरीबोटींवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून शुल्क आकारणी करणे म्हणजे त्यांच्यासाठी एकप्रकारची शिक्षाच आहे.

खरेतर सरकारने येथे तिसरी फेरी बोट उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण आत्ता आहेत त्या कमी पडताहेत. ओल्ड गोवा-दिवार मार्गावरील फेरीबोट सेवा सुधारण्याची गरज आहे, असे असताना शुल्क आकारणीचा विचार चुकीचा असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करताहेत.

Goa Ferry Boat
Goa Foundation: म्हादई व्याघ्र प्रकल्पाबाबत गोवा फाऊंडेशनकडून राज्य सरकारविरोधात अवमान अर्ज दाखल

काही जणांनी मात्र फेरी बोट सेवा सुधारल्यास अल्प शुल्क भरण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. काही ग्रामस्थांकडून हा चांगला पण उशिराने घेतलेला निर्णय आहे, असे मत व्यक्त होत आहे. सरकारला महसूल मिळणार असेल तर स्वागत आहे.

विभागाने नदीच्या दोन्ही काठावर कार्यालये उघडावीत, असेही काहीजणांनी सुचविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com