Goa Beaches: गोव्याच्या बीचवर बुडताना 2 रशियन मुलांसह तब्बल 19 जणांना जीवदान

दृष्टी मरिनने दिली माहिती; जीवरक्षक तत्पर
Goa Drishti Marine
Goa Drishti MarineDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drishti Marine: गोव्यात पर्यटन हंगामाला सुरवात झाल्यापासून सुप्रसिद्ध बीचेसवर पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यातून अनेकदा सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर बुडण्याच्या घटना घडत असतात.

या आठवड्यात गोव्याच्या किनारपट्टीवर बुडताना दोन रशियन मुलांसह 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे. दृष्टी मरिनच्या जीवरक्षकांनी तत्परता दाखवल्यामुळे हे जीव वाचले आहेत.

राज्याच्या पर्यटन विभागाने समुद्रकिनाऱ्यांवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी दृष्टी मरिन ही एजन्सी नेमली आहे. या एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

Goa Drishti Marine
Goa Ferry Boat: फेरीबोटमध्ये दुचाकींवर शुल्क आकारण्यास बेटवासियांचा आक्षेप

दृष्टी मरीनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील आरंबोळ समुद्रकिनाऱ्यावर 7 ते 11 वर्षे वयोगटातील दोन रशियन मुलांना बुडताना वाचवण्यात आले.

तर राजस्थानमधील 26 वर्षीय पुरुष आणि तेलंगणातील 42 वर्षीय महिलेलाही जीवरक्षक मनोज परब आणि उमेश फडते यांनी वाचवले.

बागा बीचवर, हैदराबादमधील एका आठ वर्षांच्या मुलाला कर्मचारी रोहन घाडीने रेस्क्यू ट्यूबचा सहाय्याने वाचवले. त्याचवेळी कर्नाटकातील 32 वर्षीय पुरुष आणि रशियातील 45 वर्षीय महिलेलाही बुडण्यापासून वाचवता आले.

Goa Drishti Marine
Ramesh Tawadkar: माझ्यासमोर वेळेची मर्यादा नाही; सध्या सर्वांच्या बाजू ऐकून घेतोय...

याशिवाय मुंबईतील एका 32 वर्षीय व्यक्तीला हणजुणे बीचवर बुडताना वाचवण्यात आले. तर दिल्लीतील एका 38 वर्षीय महिलेला जीवरक्षक राजेश धुरी यांनी आश्वे बीचवर वाचवले.

कळंगुट किनाऱ्यावर महाराष्ट्रातील दोन महिला आणि कर्नाटकातील दोन पुरुषांना बुडताना दृष्टी मरिनच्या जीवरक्षकांमुळे जीवदान मिळाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com