National Highways Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: राष्ट्रीय महामार्गावर समस्या उद्‌भवणार नाही

डी. सी. गुप्‍ता: पर्वरी परिसर वगळता संपूर्ण चारपदरी रस्‍त्‍याचे काम अं तिम टप्प्यात

दैनिक गोमन्तक

पणजी: उत्तर गोव्‍यातील पत्रादेवी ते दक्षिण गोव्‍यातील पोळेपर्यंतच्‍या महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. काम नेमकेपणाने केल्यामुळे समस्या उद््भवणार नाही, असे बांधकाम खात्याचे अभियंता डी. सी. गुप्ता यांनी सांगितले.

महामार्ग क्रमांक 66 काही ठिकाणी चारपदरी तर काही ठिकाणी दोन पदरी, असे या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. केंद्र सरकारने पत्रादेवी ते पोळे असा सलग आणि समांतर चारपदरी महामार्ग करण्याचे नियोजन केले होते. सध्या पूर्ण होत असलेला महामार्ग आणि सरकारने नियोजित केलेला महामार्ग यात काही ठिकाणी बदल केल्‍याचे दिसत आहे. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी, रस्‍त्‍यावर पाणी साठणे अशा समस्या निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे अभियंता - १ डी. सी. गुप्‍ता यांना विचारले असता ते पुढे सांगितले, या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत होते. यावर राज्‍य सरकारच्‍या सार्वजनिक बांधकाम खात्‍याची देखरेख आणि कामाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती. मूळात हा संपूर्ण चारपदरी महामार्गाचे नियोजन होते. पण राज्‍याच्‍या काही भागातील महामार्गाला लागून असलेल्‍या गावांतून आणि उपनगरांतून विरोध झाला. विशेषतः पर्वरी परिसरातील नागरिकांनी विरोध केला.

लोकांच्‍या समस्या लक्षात घेऊन महामार्ग बांधकाम सलग न करता मूळ रस्‍त्याला धरूनच करण्यात आले. पर्वरी येथील रस्‍त्‍याचे रुंदीकरण करण्यात आले असून भविष्यात या ठिकाणी कोणतीही समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी आम्‍ही घेतली आहे.

समुद्र किनारपट्टीला समांतर असलेला हा महामार्ग पूर्वी अनेक ठिकाणी अरुंद होता. धोकादायक वळणे होती. तर काही ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्रे होती. तसेच महामार्गालगत अनेक गावे आणि उपनगरे होती. या सर्वांचा परिणाम एकूणच दळणवळणावर होत होता. या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र सरकारने चारपदरी महामार्ग करण्याचानिर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT