Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: सकाळी गारवा, दुपारी ऊन-पावसाचा खेळ! थंडी पडणार की मुसळधार सरी कोसळणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

Goa Rain: राज्यात यंदा ऑक्टोबर महिन्यात मान्सूनोत्तर पावसाने धुमशान घातले आहे. सरासरीच्या तुलनेत १२७ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात यंदा मे महिन्यापासून पाऊस सुरू असून आता ऑक्टोबर संपला तरी ‘ढग’ कायम आहेत. एकंदरीत सुरू असलेल्या पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारवा जाणवत असला तरी हिवाळ्याची थंडी दाखल होण्यास यंदा विलंब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, २०१९ नंतर राज्यात सर्वाधिक मान्सूनोत्तर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात यंदा ऑक्टोबर महिन्यात मान्सूनोत्तर पावसाने धुमशान घातले आहे. सरासरीच्या तुलनेत १२७ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली. यंदा राज्यात ३७४ मिमी म्हणजेच १४.७५ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली जी आतापर्यंतच्या मान्सूनोत्तर पावसाच्या तुलनेत पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेने जारी केलेल्या आकडेवाडीत नमूद करण्यात आली आहे. राज्यात २०१९ साली ५४६.८ मिमी म्हणजेच २१.५२ इंच पावसाची नोंद करण्यात आली होती.

पणजीत ऊन–पावसाचा खेळ!

शुक्रवारी पणजी शहरात उन आणि पावसाचा खेळ सुरूच होता. काही भागांत हलक्या सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी सूर्यदर्शनही झाले. पहाटेच्या वेळी थोडासा गारवा जाणवत असल्याने वातावरणात बदलाची चाहूल लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये ‘हा अजून पावसाळा की हिवाळ्याची चाहूल?’ असा प्रश्न पडत आहे.

२४ तासांत ११.६ मिमी

गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी ११.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. म्हापसा, पेडणे, पणजी जुने गोवा धारबांदोडा, मडगाव आदी भागात पावसाची नोंद करण्यात आली मान्सूनोत्तर कालावधी संपत आला असला तरी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावातून अजूनही पावसाची रिपरिप सुरू आहे. पुढील काही दिवस राज्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

मान्सूनोत्तर सर्वाधिक पाऊस असा

वर्ष मिमी इंच

२०१९ ५४६ २१.५२

२००६ ४२३ १६

१९५५ ४१३ १६

१९८५ ३९४ १५

२०२५ ३७४ १४.७४

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"नोकरी घोटाळ्यावर बोलणार पण..." पूजा नाईकच्या आरोपांवर मंत्री सुदिन ढवळीकरांनी स्पष्ट केली बाजू

"गो टू युवर कंट्री", मध्यरात्री गोवा पोलिसांनी गाडी थांबवली, पुरुष अधिकाऱ्याने केली शिवीगाळ; डीजे क्रिस्पी क्रिस्टिनाचा Video Viral

Yadava Dynasty Battle: चित्रप्रभू चालून गेला, अल्लाउद्दिनचे पुत्र ठार झाले! तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली; खिलजीची देवगिरीवर स्वारी

'गोव्याची प्रतिमा धोक्यात येतेय!', 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमाचे आयोजन; महिला मंचाचा कडक आक्षेप

Goa Live News: गोवा पोलिसांकडून विवादास्पद कार्यक्रम रद्द! 'कामासूत्र आणि ख्रिसमस' कार्यक्रमाच्या आयोजकांना निर्देश

SCROLL FOR NEXT