Goa Rain: ऑक्टोबरमध्ये 'रेकॉर्डब्रेक' पाऊस! 121% जास्त कोसळला; अजूनही तुरळक सरींची शक्यता

October rainfall record: राज्यातील मान्सूनपूर्व, मान्सून आणि मान्सूनोत्तर पाऊस पाहता आतापर्यंत यंदा राज्यात सरासरी १६२.४८ इंच इतक्या पावसाची नोंद केली आहे.
Goa Rain Alert
Goa Rain AlertDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात यंदा मान्सूनोत्तर कालावधीत ऑक्टोबर महिन्यात सरासरी १४ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली, जी ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या मान्सूनोत्तर पावसाच्या तुलनेत विक्रमी तब्बल १२१ टक्के अधिक पाऊस असल्याचे गोवा वेधशाळेने म्हटले आहे.

राज्यात सर्वसामान्यपणे मुरगाव तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी पावसाची नोंद होते; परंतु मान्सूनोत्तर पावसात यंदा तब्बल १९.१५ इंच इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद मुरगावात करण्यात आली आहे. राज्यात यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यात मान्सून दाखल झाला, तो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत होता.

राज्यातील मान्सूनपूर्व, मान्सून आणि मान्सूनोत्तर पाऊस पाहता आतापर्यंत यंदा राज्यात सरासरी १६२.४८ इंच इतक्या पावसाची नोंद केली आहे. दरम्यान, शुक्रवारपासून (ता. ३१) राज्यात तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

Goa Rain Alert
Montha Cyclone Update: मोंथा वादळाचा 'शालिमार एक्सप्रेस'ला फटका! गोव्यातून सुटली उशिरा; किनारपट्टीजवळील 120 रेल्वेगाड्या रद्द

सर्वाधिक मान्सूनोत्तर पाऊस

गोव्यात २०१९ साली मान्सूनोत्तर तब्बल ५८८.५ मिमी म्हणजेच २३.१६ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती, जो सरासरी मान्सूनोत्तर पावसाच्या तुलनेत १८० टक्के अधिक होता. हा त्यावर्षीचा देशातील सर्वाधिक मान्सूनोत्तर पाऊस पडण्याच्या आकडेवारीतील सर्वाधिक पावसापैकी एक होता.

Goa Rain Alert
Goa Rain: कुठे बाजार बुडला, कुठे कोसळलं छत, हा पाऊस जाणार कधी? हवामान खात्याने दिली 'चांगली बातमी'

यंदाचा एकूण पाऊस

मिमी इंच

मान्सूनपूर्व ६३० २४.८१

मान्सून ३१३५ १२३.३८

मान्सूनोत्तर ३६२ १४.२६

एकूण ४१२७ १६३.४८

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com