Goa unregistered homestays action Dainik Gomantak
गोवा

नोंदणी न केलेले होम स्टे, हॉटेल्सवर कारवाई अटळ! सरकारी महसूल बुडविणाऱ्यांची गय नाहीच, पर्यटनमंत्र्यांचा थेट इशारा

Unregistered Homestays: राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्‍ध व्‍हाव्‍यात, यासाठी सरकार होम स्‍टे, हॉटेल्‍स तसेच ‘एअरबीएनबी’सारख्‍या आस्‍थापनांना आवश्‍‍यक ते सर्व सहकार्य करीत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘‘पर्यटन खात्‍याकडे नोंदणी नसलेल्या आणि बेकायदेशीररित्‍या पर्यटकांना निवास उपलब्‍ध करून देणारे गेस्‍ट हाऊस, होम स्टे, हॉटेल्स आणि ‘एअरबीएनबी’ मालमत्तांच्‍या मालकांवर कडक कारवाई करून त्‍यांना नोंदणी करण्‍यास भाग पाडू’’, असा स्पष्ट इशारा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

‘‘राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्‍ध व्‍हाव्‍यात, यासाठी सरकार होम स्‍टे, हॉटेल्‍स तसेच ‘एअरबीएनबी’सारख्‍या आस्‍थापनांना आवश्‍‍यक ते सर्व सहकार्य करीत आहे. तरीही गोव्‍यात ‘सेकंड होम’ म्‍हणून परप्रांतीयांनी घेतलेल्‍या अनेक व्‍हिला, अपार्टमेंटची नोंदणी पर्यटन खात्‍याकडे न करता त्‍यांचा वापर बेकायदेशीरित्‍या होम स्‍टे म्‍हणून केला जात आहे.

त्‍यामुळे सरकारी महसूल बुडत चालला असल्‍यानेच यापुढे व्‍हिला, आस्‍थापनांचा बेकायदेशीररित्‍या होम स्‍टे म्‍हणून वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून, त्‍यांना पर्यटन खात्‍याकडे नोंदणी करण्‍यास भाग पाडले जाणार आहे.

पर्यटकांसाठी स्‍वर्ग असलेल्‍या गोव्‍यात दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येतात. अशा पर्यटकांना होम स्‍टेची सुविधा देण्‍यासाठी काही एजन्‍सी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून घेतात. परंतु, गोव्‍यात दाखल झाल्‍यानंतर बुकिंग केलेल्‍यांना ती हॉटेल्‍स, व्‍हिला मिळत नाहीत. त्‍यांची आर्थिक फसवणूक होते. यावर नियंत्रण आणण्‍यासाठीचे प्रयत्‍न पर्यटन खात्‍याने सुरू केले आहेत. - रोहन खंवटे, पर्यटनमंत्री.

‘गोवा बियॉण्ड बीचेस’

‘गोवा बियॉण्ड बीचेस’ या उपक्रमांतर्गत ग्रामीण भाग, निसर्ग पर्यटन, स्थानिक खाद्यसंस्कृती, वेलनेस, साहसी उपक्रम, आयुर्वेद, योग आणि आध्यात्मिक पर्यटनाला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे’’, असेही मंत्री खंवटे म्‍हणाले. या कार्यक्रमात प्रथमेश म्हावळिंगकर यांना पर्यटनमंत्री खंवटे यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट गोवन इन्फ्लुएन्सर पुरस्कार’ प्रदान करण्‍यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Price Hike Alert: दिवाळीच्या सणाआधीच महागाईचा दणका! AC, TV, फ्रिज आणि वॉशिंग मशीन महागणार; ग्राहकांना वाढीव किंमत मोजावी लागणार

Horoscope 28 Saptember 2026: करिअरला मिळणार गती, वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार! आज 'या' राशींच्या नक्षत्रात चमकणार यशाचा तारा

History: सदाशिवगड ताम्रपट अन् गोव्यातील कदंब

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

SCROLL FOR NEXT