Goa Water Shortage Dainik Gomantak
गोवा

Goa Water Shortage: 'पावसाचे प्रमाण कमी तरीही पाण्याची कमतरता भासणार नाही'; जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांचा दावा

Subhash Shirodkar Water Management: यंदा पावसाचे प्रमाण दरवर्षीपेक्षा काहीसे कमी असले, तरी आवश्यक तेवढा पाऊस झाला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: यंदा पावसाचे प्रमाण दरवर्षीपेक्षा काहीसे कमी असले, तरी आवश्यक तेवढा पाऊस झाला आहे. यंदा पाऊस १०० इंचांचा टप्पा गाठेल. त्यामुळे राज्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी अपेक्षा जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केली.

साळावली धरण ६५ ते ७० टक्के भरले आहे. त्याचबरोबर आजपासून कुशावती नदीतील पाणी वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे साळावली धरणात तसेच सांगे परिसरात पुरेसे पाणी उपलब्ध राहणार आहे. सर्व धरणांवर पाण्याचे व्यवस्थापन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शिरोडकर यांनी मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

पूर्वी साळावली धरणातून ७० एमएलडी पाणी दवर्ली येथे पाठवले जात होते. मात्र, त्यापैकी ३० एमएलडी पाण्याचा अपव्यय होत होता. सांगे येथूनही पाणी सोडावे लागत होते; ते आता बंद होईल, अशी माहिती त्यांनी दिली. गोव्यातील नद्यांमध्ये जिथे-जिथे पाणी उपलब्ध आहे, ते वापरले जाईल. पाणी न वापरता ते समुद्रात जाऊ देणे आणि ते खारट होऊ देणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

३० ते ४० एमएलडी पाणी वाचणार

केपे येथे कुशावती नदीतील ३० ते ४० एमएलडी पाणी पंप करून दवर्ली येथे पाठविले जाणार आहे. तेथून हे पाणी वेर्णा, जुवारी, कुठ्ठाळी व वास्को भागात पुरवले जाईल. कुशावती नदीतील पाण्याचा वापर सुरू झाल्याने साळावली धरणातील ३० ते ४० एमएलडी पाणी वाचणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT