Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; 2, 4, 6 व्या सत्र परीक्षेसाठी उपस्थितीचा नियम शिथिल

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून गोवा विद्यापीठ राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करणार आहे.

Pramod Yadav

Goa University: गोवा विद्यापीठाने आगामी परीक्षेसाठी उपस्थितीचा नियम शिथिल केला आहे. दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित उपस्थितीची अट मागे घेतली आहे. याबाबत विद्यापीठाच्या वतीने परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

(Goa University withdraws the Criteria of Compulsory Attendence for general degree courses)

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून गोवा विद्यापीठ राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करणार आहे. त्यामुळे सध्या दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित उपस्थितीची अट शिथिल करण्यात आली आहे. सध्याच्या शिक्षण धोरणातून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, बदल सोईस्कर व्हावा यासाठी या नियमात बदल करण्यात आलाय. असे विद्यापीठाने म्हटले आहे.

त्यामुळे आगामी एप्रिल 2023 च्या नियोजित परीक्षा त्यांच्या उपस्थितीचा मुद्दा विचारात न घेता देता येतील असे या विद्यापीठाने म्हटले आहे.

विद्यापीठाशी सलंग्न सर्व महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

दरम्यान, उपस्थितीचा नियम शिथील करावा याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देखील विद्यापीठाकडे मागणी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT