goa university teachers association Press Dainik Gomantak
गोवा

Goa University: धमकी देणाऱ्यांवर कारवाई न केल्यास निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकणार

Goa University: गोवा विद्यापीठ शिक्षक संघटनेचा एल्गार

दैनिक गोमन्तक

Goa University: गोवा विद्यापीठातील प्राध्यापक तथा विद्यार्थी निवडणूक समितीचे अध्यक्षांना व त्यांच्या सहकाऱ्यांना विद्यापीठातील काही विदयार्थ्यानी गुंडागिरी करीत धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.

दरम्यान गुंडागिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करुनही कोणतीच कारवाई झाली नाही.

त्यामुळे विद्यापीठातील शिक्षकांनी सोमवारी विद्यापीठ परिसरात एकत्र येत शिक्षक संघटनेच्यावतीने घटनेचा निषेध नोंदवला. तसेच निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा एल्गारही केला.

गुंडागर्दी करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर त्‍वरित कारवाई केली नाही तर विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेवर शिक्षक संघटना बहिष्कार टाकेल, असा इशारा गोवा विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामराव वाघ यांनी दिला.

"विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात नाही. कारवाई करण्यापासून विद्यापीठाला कोण रोखत आहे? कोणाकडून दबाव आणला जात आहे? असे सवाल प्रा. वाघ यांनी उपस्‍थित केले.

गोवा युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने (गुटा) आज विद्यापीठ परिसरात निदर्शने करून शिरीष परब आणि त्याच्या दोन साथीदारांवर विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत अडथळा आणल्याबद्दल आणि धमकावल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली.

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये या तिघांनी वारंवार केलेल्या गुंडगिरीचा निषेध करणाऱ्या निवेदनावर मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या शिक्षकांनी स्वाक्षऱ्या केल्‍या.

गुंडांना राजकीय आशीर्वाद?

शिरीष परब आणि त्‍याच्‍या साथीदारांची दादागिरी वाढत चालली आहे. आता तर त्‍यांनी विद्यार्थी कल्याण आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना धमकावले आहे.

याबाबत अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. राजकीय आशीर्वादाशिवाय हे शक्‍य नाही, असा आरोप गोवा विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामराव वाघ यांनी केला.

दरम्यान, एनएसयूआयच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, हे तिन्‍ही विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संलग्न आहेत.

"सध्‍या गोवा विद्यापीठात जी गुंडागर्दी सुरू आहे ती विद्यापीठाला शोभणारी नाही. शिरीष परब व त्‍याचे काही मित्र विद्यार्थी वारंवार संचालकांना धमकावत आहे." "त्‍यामुळे ते मागील कित्येक दिवसांपासून तणावात आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जात नाही."
प्रा. रामराव वाघ, गोवा विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT