Goa University  Dainik Gomantak
गोवा

लोहखनिजातून सूक्ष्मजीव मिळवण्यात गोवा विद्यापीठाच्या सुजाता दाबोळकरला यश

सुजाता दाबोळकर हिने डॉ. नंदकुमार कामत यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: सुमारे 100 वर्षांपूर्वी रशियन शास्त्रज्ञ विनोग्राडस्की यांनी शोधलेल्या पद्धतीत क्रांतिकारी बदल करून गोवा विद्यापीठाच्या संशोधकांनी स्थानिक 150 ते 250 कोटी वर्षे पुरातन व विदेशात निर्यात केल्या जाणाऱ्या लोहखनिजातून जीवतंत्रज्ञान क्षेत्रात फार उपयोगी अशा गंधकजीवी सूक्ष्मजीवांचा  शोध लावला आहे.

विशेष म्हणजे, भारताला (India) हे फार किमती जीव परदेशातून आयात करावे लागतात. पण या संशोधनामुळे आता असे मौल्यवान जीव संपादण्यात देश स्वयंपूर्ण होईल. ही पद्धत फार सोपी आणि स्वस्त आहे. वनस्पतीशास्त्र विभागातील पीएचडीची विद्यार्थिनी (Student) सुजाता दाबोळकर हिने तिचे संशोधक, मार्गदर्शक, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ हे यश मिळवले आहे. हे संशोधन इकॉलॉजी, एन्व्हायर्नमेंट या विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय नियतकालिकात जानेवारी 2022 मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

अतिसूक्ष्म सुवर्णकण बनवणे शक्य

हे सूक्ष्मजीव वापरून अतिसूक्ष्म सुवर्णकण तयार करता येतात. त्यामुळे आता स्थानिक लोहखनिजातून सोने शुद्ध स्वरूपात मिळवण्यासाठी सोपी प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. हे संशोधन यापूर्वी आसाममध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT