Goa University election results Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठ ‘युनायटेड पॅनल’ विजयी! ऋतिक मांद्रेकर अध्यक्ष; ‘टुगेदर फॉर’ गटाला धक्का

Goa University Student Council Election: गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी आणि युनायटेड युनिव्हर्सिटी असे दोन प्रमुख गट आमनेसामने ठाकले होते

Akshata Chhatre

पणजी: गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी आणि युनायटेड युनिव्हर्सिटी असे दोन प्रमुख गट आमनेसामने ठाकले होते या निवडणुकीत युनायटेड युनिव्हर्सिटी गट पहिल्यांदाच निवडणुकीत उतरला होता. या गटाने मागील अनेक वर्षे विद्यापीठाचा गड राखलेल्या ‘टुगेदर फॉर युनिवर्सिटी’ ला धक्का दिला असून संपूर्ण प्रमुख पॅनल युनायटेड युनिव्हर्सिटीचे निवडून आले आहे.

गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी ऋतिक मांद्रेकर निवडून आले आहेत. टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी मागील काही वर्षांपासून गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळात आपले स्थान अबाधित राखून होते परंतु यंदा पहिल्यांदाच युनायटेड युनिव्हर्सिटी गट निवडणूक लढवत निवडणुकीत बाजी मारली. जुनी संघटना गड राखण्यात अपयशी ठरली असून युनायटेडने यश मिळवले.

‘एनएसयूआय’ मुख्य निवडणुकीतच उतरणार

मागील काही निवडणुकांमध्ये एनएसयूआय गोवा विद्यापीठ निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा. परंतु यंदा मुख्य निवडणुकीतच उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे एनएसयूआय पदाधिकाऱ्याने सांगितले. अभाविप गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत मागील काही वर्षे सहभागी झालेली नाही. केवळ मुख्य निवडणुकीत उमेदवार उतरवत आली आहे.

विद्यार्थी मंडळ असे; गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ अध्यक्षपदी ऋतिक मांद्रेकर, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिनिधी- अथर्व पेडणेकर, सचिव-सर्वेश सातस्कर, महिला प्रतिनिधी -सिया कळंगुटकर हे निवडून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT