Subhash Phaldesai meets Sambhaji Raje Dainik Gomantak
गोवा

गोवा विद्यापीठात छत्रपती शिवरायांवरील अभ्यास केंद्र होणार सुरू! मंत्री फळदेसाईंनी घेतली संभाजीराजेंची भेट; 26 ऑक्टोबरला येणार गोव्यात

Subhash Phaldesai meets Sambhaji Raje: गोवा विद्यापीठात छत्रपती शिवरायांवरील संशोधन अभ्यास केंद्र सुरू करण्यासाठी पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई हे प्रयत्नशील आहेत.

Sameer Panditrao

पणजी: गोवा विद्यापीठात छत्रपती शिवरायांवरील संशोधन अभ्यास केंद्र सुरू करण्यासाठी पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई हे प्रयत्नशील आहेत. त्याअनुषंगाने फळदेसाई यांनी छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती (कोल्हापूर) यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

फळदेसाई यांनी दिलेल्या निमंत्रण संभाजीराजे छत्रपती यांनी स्वीकारले असून, ते पुढील महिन्यात २६ ऑक्टोबर रोजी गोव्यात येण्याचे मान्य केले आहे. देवीच्या दर्शनानंतर फळदेसाई यांनी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांचीही त्यांनी भेट घेतली.

फळदेसाई हे शिवप्रेमी आहेत. राज्यात विविध ठिकाणी शिवजयंती साजरा करण्यामध्ये फळदेसाई यांचे सहकार्य राहिले आहे. त्याशिवाय राज्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचेही पाऊल त्यांनी उचलले आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांवरील संशोधन केंद्र गोव्यात व्हावे, अशी त्यांची इच्छा राहिली आहे.

दरम्यान, भेटीप्रंसगी संभाजीराजे छत्रपतींनी मंत्री फळदेसाई यांना आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना रायगड किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम पाहण्यास येण्याचे आमंत्रणही दिले आहे. फळदेसाईनीही त्यांचे निमंत्रण स्वीकारून मुख्यमंत्र्यांना ही कल्पना देऊ, असे सांगितले.

देवी अंबाबाईचे घेतले दर्शन

नदी परिवहन, पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर गेले होते. नवरात्रीनिमित्त त्यांनी सपत्निक कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे सोमवारी दर्शन घेतले. फळदेसाई यांच्याबरोबर खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले हेही सपत्निक दर्शनासाठी उपस्थित राहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT