Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठ टॉप 100 विद्यापीठांमधून बाहेरच; सलग दुसऱ्या वर्षी नामुष्की

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa University: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क ( NIRF) च्या माहितीनुसार गोवा विद्यापीठ सलग दुसऱ्या वर्षी भारतातील टॉप 100 विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवू शकले नाही. दरवर्षी अधिकाधिक विद्यापीठे या शर्यतीत प्रवेश करत असतात.

गोवा विद्यापीठ 2021 मध्ये टॉप 100 वरून 2022 मध्ये 101 ते 150 बँडवर घसरले होते. ते 2023 मध्येही कायम आहे. काही इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल बी. मेनन म्हणाले की काही आठवड्यांच्या कालावधीत, विद्यापीठ NIRF मध्ये आपला स्कोअर मिळवण्यास सक्षम असेल. विद्यापीठाचे रँकिंग 101 ते 150 बँडमध्ये आहे, जे मागील वर्षी सारखेच आहे.

प्रत्येक निकषाचे एकूण गुण आणि वैयक्तिक गुण मिळाल्यानंतरच विश्लेषण केले जाऊ शकते.

NIRF स्पर्धेत प्रवेश करणार्‍या संस्थांचे मुल्यमापन शिक्षण, संसाधने, संशोधन, व्यावसायिक पद्धती, पदवीचा फायदा, सर्वसमावेशकता घटकांद्वारे केले जाते. 2018 मध्ये NIRF मध्ये गोवा विद्यापीठाची रँक 68 होती तर 2019 मध्ये ती 93 झाली.

आता गोवा विद्यापीठ अव्वल शंभरातूनही बाहेर पडले आहे.

NIRF 2023 मध्ये, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) गोवा ही संस्था देशातील 100 सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान संस्थांमध्ये 90 व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, NIT गोवा सलग पाचव्या वर्षी NIRF मधील भारतातील 100 सर्वोत्तम तंत्रज्ञान संस्थांमध्ये आहे.

एनआयटी गोवा 2022 मध्ये 88 व्या क्रमांकावर होती. गोवा कॉलेज ऑफ फार्मसी (पणजी) ने देशातील 100 टॉप-रँक असलेल्या फार्मसी संस्थांमध्ये 66 व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. संस्थेची या क्रमवारीत घसरण झाली आहे. ही संस्था पुर्वी 55 व्या क्रमांकावर होती.

गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (GIM) साखळी ही संस्था गोव्यातील एकमेव आहे जिने गेल्या वर्षीच्या 36 व्या क्रमांकावरून 33 व्या क्रमांकावर झेप घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT