International Yoga Day 2023 and Goa G20 Meetings: जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. गोव्यात सध्या जी-२० च्या विविध बैठका होत आहेत. या बैठकीसाठी आलेले परदेशी प्रतिनिधी आणि मंत्रीमंडळातील मंत्री देखील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगासने करणार आहेत.
योग प्रात्यक्षिकांचे हे कार्यक्रम गोव्यातील सुप्रसिद्ध समुद्रकिनारे, स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.
जी२० या प्रभावशाली गटाच्या दोन महत्त्वाच्या पर्यटन विषयक बैठकींच्या समवेत साईड इव्हेंटचा भाग म्हणून या बैठकीतील प्रतिनिधी योग सत्रांमध्ये भाग घेणार आहेत.
चौथी G20 पर्यटन कार्यगटाची बैठक आणि G20 मंत्रीस्तरीय बैठक 19 जून ते 22 जून या काळात गोव्यात होणार आहे. भारत 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस (IYD) साजरा करेल, जो गोव्यात आयोजित केल्या जाणार्या G20 कार्यक्रमांच्या अनुषंगाने असेल.
G20 ची बैठक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या काळातच होणार असल्याने प्रतिनिधींना इतर सांस्कृतिक कार्यांबरोबरच गोव्यातील योग देखील अनुभवायला मिळेल.
G20 मंत्री गटाच्या बैठकीतील प्रतिनिधी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममधील योग सत्रात सहभागी होतील. तर काही प्रतिनिधी गोव्यातील दोना पावला बीचवरील योग प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
चौथी G20 टुरिझम वर्किंग ग्रुप (TWG) बैठक 19-20 जून रोजी होणार आहे. या बैठकीचा उद्देश जागतिक पर्यटन आव्हाने आणि संधींवर चर्चा करणे आणि त्यांचे निराकरण करणे हा आहे.
तर G20 मंत्रिस्तरीय बैठक 21-22 जून रोजी होणार आहे, ज्यामध्ये पर्यटन मंत्र्यांचा समावेश आहे. G20 देशांचे आणि इतर आमंत्रित अतिथी निर्णयांच्या परिणामांची चर्चा करतील.
बैठकीनंतर शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पर्यटनासाठी रोडमॅप आणि कृती आराखडा घोषित केला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.