Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa Molestation Case: विद्यार्थिनींची माफी मागण्यास पोलीस अधिकाऱ्याचा नकार; चौकशी समितीसमोर केलाय 'हा' दावा

गोव्यात दिवसागणिक महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत

Ganeshprasad Gogate

Goa University Molestation Case मागील काही दिवसांपूर्वी गोवा युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे एक प्रकरण घडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पोलीस अधिकाऱ्याने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती त्याच संदर्भात एक महत्वाची माहिती हाती येतेय.

गोवा युनिव्हर्सिटीमधील झालेल्या विनयभंग केस प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने विद्यापीठातील चौकशी समितीसमोर माफी मागण्यास नकार दिलाय.

या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, मी कोणतेही गैरवर्तन केले नसून आपण निर्दोष असल्याचा दावा त्यांनी केलाय. गोवा विद्यापीठाने या घटनेचा अहवाल पोलीस मुख्यालयाला दिल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे.

गोव्यात सध्या गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून दिवसागणिक महिलांवरील अत्याचाराच्या घटनादेखील वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी एका राजकीय व्यक्तीच्या संबंधित सेक्स स्कॅन्डल प्रकरणाची चर्चा रंगली होती.

त्यानंतर सर्व विरोधकांनी राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप करत सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT