NSUI Goa Delegation meets VC of Goa University: Dainik Gomantak
गोवा

NSUI Goa: विद्यार्थिनीची सुरक्षा करण्यात गोवा विद्यापीठ अपयशी; लैंगिक शोषण प्रकरणांतील दोषींवर कडक कारवाई करा...

'एनएसयुआय'ची मागणी; कुलगुरूंची घेतली भेट

Akshay Nirmale

NSUI Goa Delegation meets VC of Goa University: गोवा विद्यापीठात झालेल्या विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणच्या प्रकरणांबाबत दोषींवर कडक कारवाई करावी, या प्रकरणांचा सखोल तपास करावा, अशी मागणी एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेने केली आहे. एनएसयुआयच्या शिष्टमंडळाने आज, सोमवारी गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले की, एनएसयुआय गोवाने कुलगुरूंची भेट घेतली. विद्यापीठात एका प्राध्यापकाकडून एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाले.

तसेच पोलिस अधिकाऱ्याकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार घडला. इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर पोलिस अधिकाऱ्याने गैरवर्तन केले. तिच्यावर हल्ला केला. या दोन्ही प्रकरणांचा तपास करून ती मार्गी लावायला गोवा विद्यापीठाच्या समितीला अपयश आले आहे.

विद्यापीठाला विद्यार्थिनींची सुरक्षा करण्यात, मुलींना सुरक्षा पुरविण्यात अपयश आले आहे. प्रकरण दाबायचे प्रयत्न सुरू आहेत. 20 तारखेपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

काही महिन्यांपुर्वी आम्ही कुलगुरूंची भेट घेत विद्यापीठ कॅम्पस परिसरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली होती. पोलिसांच्या राजकीय गुरूंकडून दोषींना पाठिशी घातले जात आहे. पण, हा विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. विद्यापीठाने ही जबाबदारी घेतली पाहिजे. या प्रकरणातील सत्य समोर आले पाहिजे.

या प्रकरणांची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करा. तसेच गोवा विद्यापीठाचा रस्ता खूप धोकादायक आहे. येथे साईन बोर्ड, झेब्रा क्रॉसिंग नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे येथे योग्य त्या सोसीसुविधा कराव्यात.

विद्यापाठात सुरक्षिततेसाठी काहीही करण्यात आलेले नाही. येथे कुणीही येऊ शकते. कुणीही जाऊ शकते. त्यामुळे येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विद्यापीठ परिसरात गस्त वाढविण्याची गरज आहे. तसेच सुरक्षारक्षक नेमले पाहिजेत, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: पर्यटन हंगाम सुरळीत कर रे महाराजा!

Akhil bhartiya Konkani Parishad: इथे होणारी साहित्यनिर्मिती अभिमानास्पद! अखिल भारतीय कोंकणी परिषदेत डॉ. देवी यांचे उद्गार

Goa Weather: गोव्यात थंडी गेली कुठे? उष्म्याने नागरिक हैराण; रोगराई पसरण्याची भीती

Viresh Borkar: '..तर गोमंतकीयांसाठी जागा राहणार नाही'! जमीन संरक्षण विधेयकासाठी आंदोलन आवश्यक; आमदार बोरकर

Bhutani Project: 'परवाने रद्द होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच'; तब्येत बिघडली तरी 'भूतानी'विरुद्ध नाईक ठाम

SCROLL FOR NEXT