CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत काशी विश्वनाथाच्या चरणी; श्रावण सोमवारनिमित्त घेतले दर्शन

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका
CM Pramod Sawant At Varanasi Baba Vishwanath Temple
CM Pramod Sawant At Varanasi Baba Vishwanath Temple Dainik Gomantak

CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी वाराणसीतील बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात हजेरी लावली. सीएम सावंत श्रावण सोमवारनिमित्त बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तामिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या सनातन धर्मावरील वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

CM Pramod Sawant At Varanasi Baba Vishwanath Temple
Goa College Student Boycott: गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार; जाणून घ्या काय घडले...

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली. मुख्यमंत्री सावंत हे खासगी दौऱ्यावर वाराणसीला आले आहेत. सोमवारी त्यांनी बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतले. त्यांनी गंगाजल आणि दुधाचा अभिषेक करण्याबरोबरच षोडशोपचार पद्धतीने बाबा विश्वनाथांची पूजा केली.

सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना केली. मंदिराबाहेर माध्यमांशी संवाद साधताना तामिळनाडूचे युवा कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. या निमित्ताने त्यांनी भारत आघाडीवर निशाणा साधला.

CM Pramod Sawant At Varanasi Baba Vishwanath Temple
Khorlim News: भोमनंतर खोर्ली ग्रामस्थांचाही महामार्ग रूंदीकरणास विरोध; बायपासची मागणी

गोव्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, इंडिया आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीनंतर सुनियोजित कटाचा भाग म्हणून उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केले आहे. अशा लोकांवर कायमची बंदी घातली पाहिजे. मी त्यांचा निषेध करतो.

सर्व हिंदू समाजाने त्यांचा निषेध केला पाहिजे. सनातन धर्म नष्ट करण्याचे त्यांचे धोरण आहे. आणि ते त्यासाठीच काम करत आहेत. त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला वाटते की, सनातन धर्मावरील बेताल वक्तव्यानंतर आपल्याला अल्पसंख्याकांची पूर्ण मते मिळतील. प्रमोद सावंत यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com