Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: टुगेदर फॉर युनव्हर्सिटी पॅनल विजयी

Goa University: गोवा विद्यापीठ निवडणूक : अमेय गावसची अध्यक्षपदी वर्णी

दैनिक गोमन्तक

Goa University: गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत सलग नवव्या वर्षी टुगेदर फॉर युनव्हर्सिटी पॅनल विजयी ठरले असून अध्यक्षपदी गोवा बिझनेस स्कूल शाखेचा विद्यार्थी अमेय गावस याची निवड झाली आहे.

सचिवपदी रूद्रांश नाईक, सांस्कृतिक सचिवपदी सतेज खांडेपारकर, महिला प्रतिनिधी अंभिशा प्रभू, पीएचडी प्रतिनिधी म्हणून चेतन भगारिया निवडून आले असल्याचे जाहीर करण्यात आले.

गोवा विद्यापीठातील गट प्रतिनिधींची निवडणूक १४ सप्टेंबर रोजी पार पडली, त्यावेळी एकूण 26 उमेदवारांपैकी 11 उमेदवार बिनविरोध, तर उर्वरित निवडणुकीद्वारे जिंकून आले.

मी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो. मागील सलग नऊ वर्षे आमचे पॅनल जिंकत आले आहे. अनेक विद्यार्थी संघटना आपल्या विजयाचा दावा करत होती, पंरतु आजच्या निकालाने विद्यार्थ्यांनी कुणाला पसंती दिली हे स्पष्ट झाले आहे.
- साहिल गाड, माजी अध्यक्ष
विद्यार्थ्यांनी आमच्यावर जो विश्‍वास दाखवला आहे, त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. निवडणुकीदरम्यान आमच्या पॅनलद्वारे विद्यार्थ्यांना जी आश्‍वासने देण्यात आली, ती प्राधान्याने पूर्ण करणार आहे.
- अमेय गावस, नवनिर्वाचित अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT