Goa Shipyard: ‘जीएसएल’ची 1246 कोटींची निव्वळ वृद्धी

Goa Shipyard: गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आभासी पध्दतीने पार पडलेल्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रभावी आर्थिक निष्कर्ष सादर करण्यात आले.
Goa Shipyard
Goa ShipyardDainik Gomantak

Goa Shipyard: गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आभासी पध्दतीने पार पडलेल्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रभावी आर्थिक निष्कर्ष सादर करण्यात आले. 31 मार्च 2023 रोजी या कंपनीची निव्वळ वृध्दी 1,346 कोटी रु. एवढी नोंद झाली असून वित्त वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत ती 9% अधिक आहे, अशी माहिती प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.

Goa Shipyard
Banastarim Market: बाणस्तारी बाजारात गाळे मिळालेले ‘अधांतरी’

या कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय हे सभेच्या अध्यक्षस्थानी होती. त्यांनीच वरील माहिती त्यावेळी दिली. या सभेत 33% अंतिम लाभांश जाहीर करण्यात आला. त्याआधी ७५% एवढा अंतरीम लाभांश जाहीर करण्यात आला होता. यामुळे भरणा झालेल्या भाग भांडवलावर वित्त वर्ष 2021-23 साठीचा एकूण लाभांश १०८% झाला आहे. वित्त वर्ष 2021-22 साठीचा एकूण लाभांश ८७% एवढा होता.

‘मेक इन इंडिया’ची अंमलबजावणी

भारत सरकारच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी असलेल्या ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’, ‘स्किल इंडिया’ अशा उपक्रमांची अंमलबजावणी कंपनीतर्फे राबविली जात आहे. तसेच विविध संरक्षण व्यासपीठांसाठी मिशन रक्षा ग्यान शक्ती यासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता तथा ‘एआय’चा वापर केला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. संरक्षण मंत्रालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे अधिकारी, भारतीय नौदल, तटरक्षक दल आदींनी दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com