Unemployment Dainik Gomantak
गोवा

Goa's Unemployment Rate: चिंताजनक! बेरोजगारीमध्ये गोवा देशात दुसरा

Goa's Unemployment Rate: 9.7 टक्के दर : सांख्यिकी मंत्रालयाचा सर्वेक्षण अहवाल जाहीर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa's Unemployment Rate: राज्य सरकारने रोजगार निर्मितीचे कितीही दावे केले असले तरी प्रत्यक्षात बेरोजगारीत गोवा देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या नियतकालिक श्रम बल सर्वेक्षणानुसार सर्व वयोगटांसाठी गोव्याचा बेरोजगारीचा दर 9.7 टक्क्यांवर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

प्रत्येक निवडणुकीआधी राज्यात बेरोजगारी कमी करण्याचे आश्वासन देण्यात येते. राज्य सरकारने मागे 50 हजार नोकऱ्या तयार करू, असेही म्हटले होते.

एकीकडे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी उमेदवार योजनेस अल्प प्रतिसाद मिळत असतानाच बेरोजगारीचा आकडा मात्र घटण्याचे नाव घेत नाही.

यामुळे फुगला आकडा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अलीकडेच राज्यात बेरोजगारी नसल्याचे म्हटले होते. इच्छुकांच्या हातास राज्यात काम मिळते, असे उदाहरणासह त्यांनी सांगितले होते.

शहरी व निमशहरी भागात दररोज अंगमेहनतीच्या कामासाठी मजुरांचे बाजार भरतात, हीसुद्धा वस्तुस्थिती नजरेआड करता येणारी नाही.

असे असले तरी सरकारी नोकरी म्हणजेच रोजगार, असे मनावर बिंबवलेला गोमंतकीय तरुण वा तरुणी खासगी क्षेत्राकडे वळण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बेरोजगारीची आकडेवारी फुगल्याचे दिसते.

मुख्यमंत्र्यांनी केलेले दावे निरर्थक

  • हा अहवाल जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीतील सर्वेक्षणावर आधारित आहे.

  • गोव्यासाठी नेहमीच्या स्थितीनुसार बेरोजगारीचा दर हा राष्ट्रीय सरासरी ३.२ % वर आहे.

  • लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक ११.१ टक्के बेरोजगारी दर आहे.

  • गोवा आणि अंदमान निकोबार ९.७ टक्क्यांच्या बेरोजगारी दरासह दुसऱ्या क्रमांकावर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT