Goa Unemployment Rate Dainik Gomantak
गोवा

Goa Unemployment Rate: गोव्यात बेरोजगारी 8.3 टक्के! युवकांना रोजगार देण्यात भाजप सरकार अपयशी, काँग्रेसची टीका

Goa Unemployment Rate 8.3 Percent : सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेच्या (पीएलएफएस) ताज्या निष्कर्षांमुळे गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे अपयश पूर्णपणे उघड झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Unemployment : सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेच्या (पीएलएफएस) ताज्या निष्कर्षांमुळे गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे अपयश पूर्णपणे उघड झाले आहे.

गोव्यात बेरोजगारी दर ८.३ टक्के इतका नोंदवला गेला असून, तो राष्ट्रीय सरासरी ३.१ टक्क्यांपेक्षा खूपच जास्त आहे. ही केवळ आकडेवारी नसून, राज्यातील युवकांसाठी रोजगार निर्माण करण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा स्पष्ट पुरावा आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेसचे मीडिया चेअरमन अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

भाजप सरकारच्या नेत्यांनी वर्षानुवर्षे विकास, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

गोव्यातील सुशिक्षित युवक रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. पात्र व्यक्तींना नोकऱ्या मिळत नाहीत आणि कुटुंबांमध्ये अनिश्चितता वाढत आहे. भाजप सरकार आपल्या आश्वासनांना वास्तवात उतरवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे पणजीकर यांनी नमूद केले आहे.

भाजप सरकारच्या निष्क्रियतेचा आणि अकार्यक्षमतेचा आम्ही तीव्र निषेध करतो. गोव्याच्या जनतेला उत्तरदायित्व हवे आहे आणि त्यांना उत्तरे हवी आहेत. आता वेळ आली आहे की जनतेने या अपयशाची सरकारला जाणीव करून देण्याची.

तसेच गोव्याच्या युवकांचे भविष्य राजकीय दिखावा आणि पोकळ आश्वासनांसाठी बळी देऊ नये, जनतेने विचार करावी, असे आवाहन पणजीकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

खरी कुजबुज: कलियुगातील 'लव-कुश'

SCROLL FOR NEXT