Ujjwala Scheme Dainik Gomantak
गोवा

Ujjwala Scheme: निम्म्याच अर्जदारांना 10 सप्टेंबरपर्यंत लाभ! सव्वादोन लाख अर्जांचीच छाननी शक्य

Goa Ujjwala Scheme: गोवा उज्ज्वला योजनेची अंमलबजावणी नागरी पुरवठा खात्यामार्फत केली जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात १० सप्टेंबरपूर्वी तीन हजार रुपये जमा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असले, तरी या मुदतीत केवळ निम्म्याच अर्जदारांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने आलेल्या अर्जांची छाननी आणि मर्यादित मनुष्यबळामुळे नागरी पुरवठा खात्यासमोर हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

गोवा उज्ज्वला योजनेची अंमलबजावणी नागरी पुरवठा खात्यामार्फत केली जात आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक तालुक्याच्या पातळीवर अधिकाऱ्यांसह साधारण दहा कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यांच्यावर प्राप्त अर्जांची छाननी, कागदपत्रांची पडताळणी आणि पात्र लाभार्थी निश्चित करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे हजारो अर्जांची तपासणी अवघ्या काही दिवसांत पूर्ण करणे कठीण ठरणार आहे.

ही अडचण लक्षात घेऊन १० सप्टेंबरपूर्वी अधिकाधिक लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी सरकारने पहिल्या टप्प्यात गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना यांसारख्या सरकारी योजनांचे विद्यमान लाभार्थी असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. या लाभार्थ्यांची माहिती सरकारी यंत्रणेकडे आधीपासून उपलब्ध असल्याने त्यांची पडताळणी तुलनेने सुलभ होणार आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अर्जांची तपासणी नागरी पुरवठा खात्यासाठी अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. अर्जदारांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, कुटुंबाची माहिती आणि अन्य निकष तपासूनच लाभ मंजूर करावा लागणार आहे.

साडेचार लाख अर्जांचा अंदाज

नागरी पुरवठा खात्याच्या अंदाजानुसार, योजनेसाठी सुमारे साडेचार लाख अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यापैकी सुमारे सव्वादोन लाख अर्जदार हे गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आणि अन्य सरकारी योजनांचे विद्यमान लाभार्थी असतील, असे गृहीत धरून त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे १० सप्टेंबरपूर्वी सव्वादोन लाख अर्जांची छाननी करून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT