Tuyem Hospital  Dainik Gomnatak
गोवा

Tuyem Hospital: तुये येथील नवे रुग्णालय अखेर ‘गोमेकॉ’शी संलग्न! देखरेख समितीसाठी होणार बैठक

Tuyem Hospital: तुये येथे नव्याने उभारलेले रुग्णालय आता बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी (गोमेकॉ) अधिकृतपणे संलग्न केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पेडणे तालुक्यातील तुये येथे नव्याने उभारलेले रुग्णालय आता बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी (गोमेकॉ) अधिकृतपणे संलग्न केले आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

आरोग्य खात्याचे सहसचिव डॉ. प्रणव भट यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तुये येथील या नवीन रुग्णालयात आता ‘गोमेकॉ’ आणि आरोग्य सेवा संचालनालयाचे डॉक्टर सेवा देणार आहेत.

या डॉक्टरांची आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती लवकरच स्वतंत्र आदेशाद्वारे केली जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विशेष उपचारांसाठी आता थेट बांबोळीला जाण्याची गरज भासणार नाही. या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाने ९ जानेवारी २०२६ रोजीच मंजुरी दिली होती.

देखरेख समितीसाठी उद्या तुये येथे बैठक

तुये हॉस्पिटलमध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी समिती निवडण्याचा निर्णय पेडणे तालुका नागरिक समितीने घेतला आहे. त्यासाठी शनिवार, २४ रोजी सायंकाळी ४ वाजता तुये हॉस्पिटल परिसरात नागरिकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पेडणे नागरिक समितीचे निमंत्रक ॲड. सदानंद वायंगणकर यांनी केले आहे.

रोडमॅप दाखवा, मगच उदघाटन

सरकार ३० तारखेला या हाॅस्पिटलचे उदघाटन करणार आहे. त्यापूर्वी रुग्णांना कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत, याचा सविस्तर रोडमॅप समितीला दाखविण्यासाठी २५ जानेवारीची मुदत दिली होती. सरकार जोपर्यंत शंकांचे निरसन करत नाही, तोपर्यंत घाईगडबडीत उदघाटन करू नये, असे मत व्यंकटेश नाईक यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT