डिसेंबर महिना म्हणजे सर्दीचा मौसम, यावेळी आपल्या जवळच्या माणसांसह कुठेतरी बाहेर जाण्याची इच्छा होते, सततचं काम यामधून काहीसा ब्रेक हा हवाच असतो. अशावेळी जर का गोव्याला जाण्याच्या विचारात असाल तर डिसेंबर आणि गोवा हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. गोव्यात थंडी देखील साजेशी आणि अंगाला न बोचणारी असते, सध्यातरी इथे चित्रपट महोत्सव, एक्सपोजीशन सारखे आंतराष्ट्रीय स्थरावरचे कार्यक्रम सुरु आहेत आणि येणाऱ्या डिसेंबर महिन्यात याला आणखीनच चार चांद लागतील. चला तर मग जाणून घेऊया डिसेंबर मध्ये गोव्याला जायचं म्हणजे नेमकं काय करत येईल..
गोवा आणि डिसेंबर महिना यासारखा उत्तम मेळ तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतात गोवा तर अगदी बुडून गेलेला असतो आणि यावेळीच इथे होतो तो सनबर्नचा भाला मोठा संगीत महोत्सव. जगभरातील काही नावाजलेले डीजे त्यांची संगीत कला इथे सादर करतात. तुम्ही जर का पार्टीप्रेमी असाल तर गोव्याला जायची ही संधी गमावू नये अशी आहे हे लक्ष्यात ठेवा. पण तुम्हाला तिकीट बुक करावे लागतील आणि यासाठी तुम्ही सनबर्न गोवाच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता.
तुम्ही पार्टी प्रेमी असाल तर डिसेंबर महिन्यात गोव्याला जरूर भेट द्या. वरती म्हटल्याप्रमाणे या काळात गोव्याच्या किनाऱ्यांवर अनेक पार्ट्या चालतात आणि दिलखुलास वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण उत्तम ठरतं.
देश विदेशातून अनेक पर्यटक यावेळी जुन्या वर्षाला रामराम करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येतात. तुम्हाला नाईट क्लबमध्ये जायचं असेल तर हा पर्याय उपलब्ध असतो शिवाय बीचवर पार्टी करायची असेल तर व्हागतोर,हणजूण, बागा यांसारख्या किनाऱ्यांवर उत्तमप्रकारे बीच पार्टी करता येते.
गोवा म्हणजे केवळ समुद्र आणि पार्टी असंच का?नाही मुळीच नाही. तुम्हाला ऍडव्हेंचर आवडत असेल, तुम्ही सतत काहीतरी वेगळं आणि हटके करण्याच्या विचारात असाल तरी गोव्याला नक्कीच जाऊन या. ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीजमध्ये इथे हॉट एअर बलून राईड बरीच फेमस आहे. एकदाका तुम्ही या बलून राईडमध्ये बसलात की उंच आकाशातून गोवा 360 डिग्रीवर बघण्याच्या एक अनोखा अनुभव मिळवता येईल. खास करून संध्याकाळी या ऍडव्हेंचरसाठी गेलात तर सूर्यास्ताच्या अनेक छटा पाहायला मिळतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.