Tourist Travel Guide Goa: गोव्यात काही मिनिटांमधे येणारी OLA किंवा Uber नाहीये. गोव्यात आलेल्या नवख्या माणसाने गोवा फिरवा तरी कसा? चला जाणून घेऊया...
Goa Travel GuideDainik Gomantak

Goa Travel Guide: गोव्यात आल्यावर प्रवासासाठी पर्याय काय? पर्यटकांनो जाणून घ्या

Tourist Travel Guide Goa: गोव्यात काही मिनिटांमधे येणारी OLA किंवा Uber नाहीये. गोव्यात आलेल्या नवख्या माणसाने गोवा फिरवा तरी कसा? चला जाणून घेऊया...
Published on

Panjim,Goa

पणजी : पर्यटक आणि गोवा यांचं एक खास कनेक्शन आहे. साधारणपणे धकाधकीच्या जीवनात काहीकाळ आराम मिळावा, रिलॅक्स करता यावं म्हणून लोकं गोव्यात येतात आणि गोवा सुद्धा शांततेच्या शोधात आलेल्या या पर्यटकांना फिरण्याचे आणि बागडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून देतो.

गोव्यातील समुद्र किनारे असो किंवा एखाद्या शांत गावातील धबधबा प्रत्येकाच्या आवडीनुसार ठिकाणं बदलता येतात. पण या सगळ्या जागांना भेट द्यावी तरी कशी? गोव्यात तर काही मिनिटांमधे येणारी OLA किंवा Uber पण नाहीये. गोव्यात आलेल्या नवख्या माणसाने गोवा फिरवा तरी कसा? चला जाणून घेऊया...

१. स्कुटर:

गोवा मनासारखा फिरायचा असेल तर हातात स्वतःची गाडी असलेलं कधीही चांगलं. यामुळे मनपसंत जागांना पाहिजे त्या वेळी भेट देता येते. गोव्यात रेंटल स्कुटर (Rental Scooter Goa) हमखास उपलब्ध असतात. स्कुटरवर फिरायचं असेल तर दरदिवसाच्या भाड्याप्रमाणे ५०० ते ६०० रुपयांमध्ये गोव्याची सफर करता येते.

गोव्यात मिळणाऱ्या या रेंटल स्कुटरमुळे Ola आणि Uber ची फारशी कमतरता जाणवत नाही किंवा बस कधी येणार असा विचार करत उन्हात भटकावं लागत नाही. मात्र ही गाडी रेंटवर घेताना सोबत आधार कार्ड ठेवा तसेच हेल्मेट आणि ड्रायविंग लायसन्स देखील असुद्या.

२. रेंटल गाडी:

बॉलीवूडच्या सिनेमाप्रमाणे संपूर्ण कुटुंबासोबत किंवा मित्रांना घेऊन गोवा फिरायला जायचं आहे पण स्वतःची गाडी घेऊन एवढा प्रवास करण्याची इच्छा नाहीये?. मग गोवा फिरवा तरी असा? चिंता करू नका कारण गोव्यात रेंटल गाड्या (Goa Rental car) देखील अगदी सहज मिळून जातात.

तुमच्या इच्छेप्रमाणे १,००० ते २,५०० पर्यंत गाडी तर मिळतेच पण गाडीने प्रवास करताना सोबत ड्राइविंग लायसन्स आणि ओळखपत्र ठेवायला विसरू नका.

३. रिक्षा:

गाडी रेंटवर घेऊन प्रवास करायचं नसेल तरीही हरकत नाही. गोव्यात रिक्षेचा एक चांगला पर्याय उपलब्ध असतो. इथे मुंबई, पुणे किंवा बंगलोर सारखं सलग रस्त्यांवर रिक्षा आढळणार नाहीत. गावांमध्ये तर रिक्षा मिळणं कठीण आहे, मात्र बस स्टॅन्ड, रिक्षा स्टॅन्ड अशा ठिकाणी रिक्षा खूप सहजपणे मिळतात. रिक्षाने जाणार असाल तर मीटर सुरु करायची आठवण करायला विसरू नका. साधारण १०० रुपयांपासून रिक्षाचा प्रवास करता येतो.

४. टॅक्सी:

रिक्षेपेक्षा कधीही अधिक सोयीस्कर असलेली टॅक्सी हा देखील गोवा फिरताना एक चांगला पर्याय ठरू शकतो. विमानतळांवर अशा टॅक्सी खूप सहज मिळतात, किंवा इथेच टॅक्सीचं प्रिबुकिंग सुद्धा करता येतं. Ola आणि Uber नसताना देखील Goa Miles हा गोवा सरकारच टॅक्सी ऍप विमानतळावरून ठिकठिकाणी फिरण्यात मोठी मदत करतो. टॅक्सीने जाणार असाल तर २००० किंवा त्याहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे.

५. बस:

गोव्यात असलेल्या सरकारी आणि खासगी बसेसमुळे कधीही तुम्हाला प्रवासात अडथळा जाणवणार नाही. सरकारी बस म्हणजे कदंबा (KTCL Goa) तर असतेच, मात्र इथे अनेक खासगी बसेसची रहदारी सुरु असल्याने पैसे वाचवत गोवा फिरायचा असल्यास हा पर्याय एकदम योग्य ठरतो.

आत्तातर गोवा सरकारने इलेकट्रीक बसची सोय केलीये, यामुळे आरामात AC बसने प्रवास करता येतो. पण केवळ बसने फिरणार असाल तर गावांमध्ये कोणत्या बसेस कधी जातात हे जाणून घेणं महत्वाचं आहे. गोव्यातली लोकं याबाबतीत मदत करतात, त्यामुळे चिंतेचं कारण नसतं.

Tourist Travel Guide Goa: गोव्यात काही मिनिटांमधे येणारी OLA किंवा Uber नाहीये. गोव्यात आलेल्या नवख्या माणसाने गोवा फिरवा तरी कसा? चला जाणून घेऊया...
Rent Bike In Goa: आम्हालाही ‘रेंट बाईक’चा परवाना द्या! खासगी दुचाकीधारकांची मागणी

६. फेरी:

एका गावातून दुसऱ्या गावात जाताना मोठाली नदी लागली तर? तर गोव्यात असलेल्या फेरीच्या मदतीने नदीच्या प्रवासाचा आनंद घेत प्रवास करता येतो. या फेरीची किंमत १० रुपयांपासून सुरु होते. मात्र तुम्ही गाडीसकट फेरीने जाणार असाल तर किंमत बदलू शकते. दीवर बेटासारख्या ठिकाणी जाणार असाल तर नक्कीच या फेरीचा आनंद घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com