TMC Press conference
TMC Press conference Dainik Gomantak
गोवा

TMC Goa : ‘तृणमूल’ परिषदेकडे फालेरोंची पाठ

दैनिक गोमन्तक डिजिटल

TMC Goa: 2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गोवा प्रदेश तृणमूल काँग्रेसची परिषद झाली. यावेळी पक्षाचे राज्यसभेचे नेते डेरेक ओ ब्रायन, गोवा प्रभारी कीर्ती आझाद उपस्थित होते.

परंतु राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो अनुपस्थित राहिले. निमंत्रित करूनही फालेरो न आल्याने हा चर्चेचा विषय ठरला.

पिलार येथे ही परिषद झाली. फालेरोंच्या अनुपस्थितीबद्दल ओ ब्रायन यांना पत्रकारांनी प्रश्‍न केला असता, फालेरो हे पक्षातील अनुभवी आणि महत्त्वाचे नेते असून ते राज्यसभा खासदार आहेत.

प्रकृती बरी नसल्याने परिषदेला आले नसल्याची माहिती मिळाली आहे. विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार असल्याचे ओ ब्रायन यांनी स्पष्ट केले.

लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसपासून बऱ्याच काळापासून दुरावा ठेवला आहे. त्यांना गोव्यातील समित्यांवर स्थान न दिल्यामुळे मध्यंतरी ते राज्यसभा खासदार म्हणून राजीनामा देणार असल्याची चर्चा होती.

विधानसभा निवडणुकीत फालेरो यांनी फातोर्ड्यातून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज होते.

भाजपविरोधी लढा तीव्र करणार

आम्ही गोव्यात जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहोत. तृणमूल हा एकमेव असा पक्ष आहे, जो भाजपविरुद्धच्या लढ्यात गंभीर आहे. भाजपच्या राजवटीत गोव्यात बेरोजगारी वाढली असून महागाईने कहर केला आहे.

संसदेत आमचे 40 सदस्य आहेत. आम्ही हे मुद्दे गोव्यात आणि संसदेतही मांडू. आमच्या सर्व योजना पश्‍चिम बंगालमध्ये लागू केल्या असून गोव्यातही त्या राबवण्याची तयारी आहे, असे ओ ब्रायन यांनी सांगितले.

उपस्थितीचा दावा पोकळ

या परिषदेला फालेरो यांच्यासह 2022 साली विधानसभा निवडणूक लढवलेले बहुतांश उमेदवारही अनुपस्थित होते. यासंदर्भात ओ ब्रायन यांना विचारले असता, 70 टक्के उमेदवारांनी हजेरी लावल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी पक्ष सहसंयोजक समील वळवईकर, मारियान रॉड्रिग्ज आणि पदाधिकारी उपस्थित होते.

"भाजपने जी आश्वासने दिली, ती पूर्ण केलेली नाहीत. त्यांनी तीन मोफत सिलिंडर्स, म्हादईचे संरक्षण तसेच जनतेला सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर त्यांनी फारकत घेतली.’ म्हादई वाचवण्यासाठी राजकीय नेत्यांनी एकजुटीने या लढ्यात सहभागी व्हावे. प्रसंगी त्यांनी आपल्या पदांचा राजीनामाही द्यावा."

- कीर्ती आझाद, गोवा प्रभारी, टीएमसी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT