Tribal Leaders Dainik Gomantak
गोवा

Tribal Leaders: दिलजमाईमुळे गोविंद गावडेंना मिळणार आदिवासी खाते?

चर्चेचा मुद्दा: दै. ‘गोमन्तक’मधील वृत्तावरून समाजात तर्कवितर्क

गोमन्तक डिजिटल टीम

Tribal Leaders सभापती रमेश तवडकर आणि कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे या दोन्ही आदिवासी नेत्यांत झालेल्या समेटाचे आज दै. ‘गोमन्तक’ने दिलेले वृत्त आदिवासी वर्तुळात बरेच चर्चेचे ठरले. या दिलजमाईमुळे आदिवासी कल्याण खाते पूर्ववत गावडे यांना मिळणार का असा मुद्दा या चर्चेतून पुढे आला आहे.

या दोन्ही नेत्यांतील वादामुळे ते खाते सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आपल्याकडे ठेवावे लागले आहे. गावडे यांच्याकडे ते खाते येण्याआधी तवडकर यांच्याकडे ते खाते होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी संसदेच्या येत्या खास अधिवेशनातच निर्णय होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने दिल्ली दरबारी प्रयत्न करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी आता आपली ताकद खर्ची घालावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या चर्चेतच या दोघांत फूट घालणारा तो नेता कोण अशी हलकीशी विचारणा केली जात होती. तवडकर यांची आदिवासी समाजातील सामाजिक व राजकीय उंची लक्षात घेऊन त्यांनी राजकीय आरक्षणासाठी नेतृत्व स्वीकारावे असे अनेकांना वाटते.

काहींनी तर हे दोन्ही नेते एकत्र येण्याचा समाजाला फायदा काय अशी विचारणाही केली. फोंड्यातील गौड मराठा नेत्यांनी तवडकर यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही यानिमित्ताने काहींनी पुरवली.

या दोन्ही नेत्यांनी आदिवासींवर अन्याय करणाऱ्या राजकीय व्यवस्थेला जाब विचारण्याची हिंमत दाखवल्यास आम्ही त्यांच्यासोबत आहोत. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी तसे न केल्यास ते नेहमीच्या पिंजऱ्यांत बंद आहेत आणि समाजाला त्यांचा काही फायदा नाही असे आम्ही मानू.

- गोविंद शिरोडकर, निमंत्रक, मिशन फॉर पॉलिटिकल रिझर्व्हेशन

दोन्ही नेते एकत्र आले ही चांगली बाब आहे. आता त्यांनी लोकसभा निवडणुकीआधी आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून द्यावे.

- रुपेश वेळीप, कार्यकर्ता, गाकुवेध

सर्वच नेत्यांनी एकत्र यावे, तसे झाले तर माझ्यासारखी दुसरी आनंदी व्यक्ती नसेल. नेते एकत्र राहिले, तर प्रश्नही लवकर सुटण्यास मदत होईल.

- प्रकाश शं. वेळीप, माजीमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: 10 गुरांचे बळी, वाहनचालक गंभीर जखमी; डिचोलीत भटक्या जनावरांमुळे अपघातांचा धोका

Goa Assembly Live: गोव्यातील लोकांना अनुदानित दरात मासे पुरवण्याचे धोरण सहा महिन्यांत तयार केले जाईल

Goa Flowers: ..मळे बहरले! 'जाई'चा घमघमाट; बोरी हमरस्ता परिसरात खरेदीसाठी होतेय गर्दी

Grahan Yog August 2025: सावधान! 10 ऑगस्टला 'ग्रहण योग'; या 3 राशींच्या लोकांनी राहावे अत्यंत सावध

Goa ST Reservation: आरक्षणानंतर समाज मूळ प्रवाहात येईल?

SCROLL FOR NEXT