Old Goa: ‘त्या’ वादग्रस्त बंगल्याचे प्रकरण ‘पुरातत्व’कडे द्या! सुप्रीम कोर्टाची संबंधितांना नोटीस

जुने गोवेतील बांधकाम : सुप्रीम कोर्टाची नोटीस
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Old Goa जुने गोवे येथील जागतिक वारसा स्थानाचा दर्जा लाभलेल्या चर्च संरक्षित क्षेत्रामध्ये उभारलेला बंगला पाडण्याचा आदेश रद्द करण्याऐवजी हे प्रकरण भारतीय पुरातत्व खात्याकडे सोपवायला हवे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले असून संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.

या प्रकरणाला राजकीय किनार असून संबंधित वादग्रस्त बांधकाम एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे असल्याची चर्चा आहे.

आदेशाला स्थगिती

भारतीय पुरातत्व खात्याने 16 ऑगस्ट 2022 रोजी प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे अवशेष अधिनियम 1958 कलम 19/2 अन्वये हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

तसेच कलम 19/अ नुसार संरक्षित क्षेत्रात मालमत्तेच्या अधिकाराचा उपभोग घेण्यावर निर्बंध घातले होते. मात्र, हा आदेश देताना संबंधित मालकाला नोटीस बजावली नव्हती आणि त्यांची बाजू मांडण्याची संधीही नाकारली होती. म्हणून या बांधकाम पाडण्याच्या आदेशाला स्थगिती दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com